औशातील कटगर गल्ली व दुध डेअरी परिसरात घाणीचे साम्राज्य

 औशातील कटगर गल्ली व दुध डेअरी परिसरात घाणीचे साम्राज्य





औसा मुख्तार मणियार

औसा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील कटगर गल्ली व दुध डेअरी परिसरात भीज पावसामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.खड्डयात घाण पाणी साचले असल्याने पाण्यावर आणि नालीत डासांचे प्रमाण वाढल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिक त्रस्त झाले आहेत.कटगर गल्ली दुध डेअरी जवळील नाल्या तुंबल्या आहेत.नगरपालिकेस नागरिकांनी अनेक वेळा कल्पना देऊनही पालिका प्रशासनासह प्रभागातील नगरसेवकही दुर्लक्ष करित आहेत.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे नागरिकांना भीती पसरली असताना या परिसरातील घाणीमुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नगरपरिषद प्रशासनाने शहरातील स्वच्छेतेकडे दुर्लक्ष होतआहे.नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.प्रभाग क्रमांक 8 मधील रस्त्यांची दयनीय अवस्था, रस्त्यावर साचलेले घाण पाणी, तुंबलेल्या नाल्या यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून पालिका प्रशासनाने स्वच्छता कर्मचारी व प्रभागातील नगरसेवकांनी या कामी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या