देशाने महान 'नाट्यगुरु' गमावला
---अमित विलासराव देशमुख
---अमित विलासराव देशमुख
मुंबई, दि. ४ ऑगस्ट
"ज्येष्ठ नाट्यकर्मी इब्राहिम अल्काझी यांचा निधनाने देशाने एक महान नाट्यगुरू गमावला आहे", अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
"राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे पहिले संचालक म्हणून त्यांनी भारतीय रंगभूमी विषयक शिक्षणाची पायाभरणी केली होती. तेथील त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक उत्तमोत्तम रंगकर्मी घडवले. उत्तम शिक्षक, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार म्हणूनही ते जागतिक स्तरावर वाखाणले गेले होते. भारतीय रंगभूमीवर नाट्यगुरु म्हणून त्यांची छाप कायम राहील", असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.