*पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडून यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेले निलेश गायकवाड आणि वैभव वाघमारे यांचे अभिनंदन*
लातूर (प्रतिनिधी):
लातूर येथील निलेश श्रीकांत गायकवाड आणि वैभव विकास वाघमारे यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलं आहे. त्याबद्दल लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या दोघांचे अभिनंदन करताना पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे की, शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्न देशपातळीवर गाजतो आहे. निलेश गायकवाड आणि आणि वैभव वाघमारे यांच्या यशाने लातूरचा लौकिक आणखीन वाढला आहे. लातूर जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांनीही निलेशच आणि वैभवचे अनुकरण करावे, यूपीएससी, एमपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून सिव्हिल सर्विसेस मध्ये स्थान मिळवावे असे पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.