आ. अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत औशात घंटानाद आंदोलन...

 आ. अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत औशात घंटानाद आंदोलन... 






औसा मुख्तार मणियार


औसा - राज्यातील मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरासह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने शनिवारी (ता. २९) घंटानाद आंदोलन करण्यात आले. या घंटानादात गजराबरोबरच झोपेत असलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत औशात हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी आ.अभिमन्यू पवार यांनी घंटानाद करित मंदिर समोर टाळ वाजवून हे आंदोलन केले. 



कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मास-मदिरा पुन्हा  सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील मंदिरे मात्र बंदिस्त ठेवले आहे. केंद्र सरकारने मंदिरे उघडण्याचे निर्देश दिल्यानंतर, राज्यातील भाविक व सर्वसामान्य नागरिकांकडून मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली. मात्र, राज्य सरकारने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे झोपी गेलेल्या ठाकरे सरकार ला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले औसा येथील हनुमान मंदिरासमोर शनिवारी सकाळी ११ वाजता आ. अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.



            याप्रसंगी औसा भाजपचे तालुकाध्यक्ष  सुभाष जाधव, सुशीलदादा बाजपाई, अॅड मुक्तेश्वर वागदरे, अॅड अरविंद कुलकर्णी,सुनील उटगे, संतोषअप्पा मुक्ता,महेश पाटील,समीर डेंग,गोपाळ धानूरे, धनंजय परसणे, दिगंबर माळी,भिमाशंकर राचट्टे, लहू कांबळे,काकासाहेब मोरे,महादेव कटके,धनराज काजळे, राजकिरण साठे, पप्पूभाई शेख,पवन राचट्टे, सागर आपुणे,माधवसिंग परिहार, जगदिश परदेशी,विकास नरहरे, सुर्यकांत शिंदे,कमलेश बायस,कल्पना डांगे,तुराब देशमुख,अच्युत पाटील,उन्मेश वागदरे,श्रीकांत स्वामी,सुमनबाई भोसले,विकास कटके,सचिन कांबळे,सचिन आनसरवाडे,प्रतिक पाटील आदीसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांप्रमाणेच आध्यात्मिक आघाडी, धार्मिक संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या