निम्न तेरणा प्रकल्पात एक टक्काच पाणीसाठा शिल्लक औसेकरांची चिंता वाढली

 निम्न तेरणा प्रकल्पात एक टक्काच पाणीसाठा शिल्लक औसेकरांची चिंता वाढली 





औसा मुख्तार मणियार

पावसाळ्याचे तीन महिने संपले असून औसा तालुक्यातील तेरणा नदी पात्रात सध्या पाणी आले नसल्याने निम्न तेरणा प्रकल्पात पाणी साठा होऊ शकला नाही.निम्न तेरणा प्रकल्पात केवळ एकच टक्का पाणी साठा शिल्लक असल्याने आगामी काळात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.पावसाळयाचे तीन महिने झाले असून केवळ एकच महिना पावसाळा राहिला असून तेरणा नदीच्या पात्रातुन एकदाही पाणी वाहिले नसल्याने धरणात पाणी साठा अत्यल्प आहे.निलंगा शहरासह औसा व उमरगा तालुक्यातील सुमारे 52 गावांना निम्न तेरणा प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी येते.औसेकर जनतेच्या मागणीमुळे माकणी धरणातून स्वतंत्र पाणी पुरवठा औसा शहरासाठी मंजूर झाला असून माकणी ते औसा पाइपलाइनचे काम युद्ध पातळीवर सूरु आहे.तसेच माकणी धरणातून उपसा सिंचन योजनेद्वारे उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा योजना यापूर्वीच कार्यान्वित आहे. औसा,निलंगा आणि उस्मानाबाद शहरासह भूकंपग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्यासाठी माकणी धरणावर अवलंबून राहावे लागते.अद्यापही नदीपात्र कोरडे असल्याने तेरणा खो-यातील शेतकऱ्यांसह परिसरातील गावांना अडचणीस तोंड द्यावे लागणार आहे. यावर्षी मृग नक्षत्रापासुन मानसून पूर्व पावसाने सुरुवात केली असली तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा सर्वांना आहे.मोठा पाऊस झाल्या शिवाय नदी आणि धरणात पाणी येने शक्य नसल्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे सर्वत्र चिंतेचा विषय बनला आहे.महिनाभरात मोठ्या पावसाची हजेरी झाली तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या