भारतीय उद्योगासाठी "उर्जा संवर्धनात उभरती तंत्रज्ञान" औद्योगिक कार्यशाळा चे आयोजन



भारतीय उद्योगासाठी "उर्जा संवर्धनात उभरती तंत्रज्ञान" औद्योगिक कार्यशाळा चे आयोजन






लातूर : सोमवार दि. ३१ ऑगस्ट रोजी पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन आणि पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ (पेट्रोलियम व  प्राकृतिक गॅस मंत्रालय भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने लाइव वेबिनार च्या माध्यमातून संस्थात्मक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक व्याख्याता केदार खमितकर (एनर्जी ऑडिटर) हे होते. यावेळी प्राचार्य डॉ. के.एम. बकवाड, यांत्रिकी विभाग प्रमुख व्ही.डी. नितनवरे, डॉ.के.आर. कदम, वरिष्ठ कर्मचारी बी.एम.चामे सर, पीसीआरए चे उप-प्रादेशिक अधिकारी श्रीमती स्वाती कुमारी पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यांत्रिकी विभागाचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी ऑनलाइन वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा प्रशिक्षण घेतले. 'ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत' Sustainable alternatives towards affordable energy &  ‘End-use energy system in practice: focus on systems not components’ while staying home' या विषयांवरती पॉवरपॉइंट सादरीकरण, डॉक्युमेंटरी फिल्म द्वारे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.  उप प्रादेशिक अधिकारी श्रीमती स्वाती कुमारी यांनी ऊर्जा बचत उपक्रम अंमलबजावणी करून भारत सरकार द्वारे प्रेरित आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी सर्वांना  केले.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या