आझाद महाविद्यालयाचा पहिला पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न
मुख्तार मणियार औसा
औसा – येथील आझाद महाविद्यालयाचा पहिला पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ सोशलडिस्टंसीग चे पालन करुन मोठ्या उत्साहात शनिवार दि.29/08/2020 रोजी संपन्न झाला, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी हिंदुस्थानी एज्यूकेशन सोसायटीचे सचिव व औसा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख साहेब तर प्रमुख पाहूणे म्हणून जयक्रांती महाविद्यालय लातूर चे प्राचार्य व सिनेट सदस्य डॉ.पी.एन.सगर आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य व राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.महादेव गव्हाणे (ऑनलाईन ) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम विद्यापीठ गीत व दीप प्रज्वलनाने झाली यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ.शेख शहाजहान यांनी केले नंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ई.यू.मासुमदार यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर करताना यामध्ये त्यांनी महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणा-या विविध उपक्रम शैक्षणिक सोयी सुविधांची माहिती दिली यानंतर प्रमुख पाहूणे मा.प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना सांगितले की,देशाला महासत्ता बनविण्याची ताकत आजच्या तरुणांमध्ये आहे जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग केल्यास देश निश्चितच महासत्ता बनेल. रोजगाराच्या आज अनेक संधी देशात उपलब्ध आहेत त्यासाठी आपल्यात गुणवत्ता असायला हवी आजचा अभ्यासक्रम देखील बदलला पाहिजे व कौशल्याभिमुख शिक्षणावर भर दिला जावा असे ते म्हणाले. या नंतर प्राचार्य डॉ.पी.एन.सगर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 21 वे शतक हे ज्ञानी माणसांचे आहे विद्वान लोक ज्या राष्ट्रात जास्त तेच राष्ट्र आगामी काळात महासत्ता बनेल संपुर्ण जगाला ज्ञानी माणसे पुरविण्याचे सामर्थ्य भारतामध्ये आहे त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे असे नमूद केले.
अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख म्हणाले की,आमच्या महाविद्यालयातुन चांगली गुणवत्ता पूर्ण व कौशल्यनिपूण विद्यार्थी घडावेत यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे आघामी काळात महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतीची सोय उपलब्ध करणे,तसेच करिअर मार्गदर्शन केंद्र सुरु करणार असल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष प्रा.संजय कुलकर्णी ,सहसचिव गजाला अरब,नगर सेविका परवीन शेख,नगर सेवक जावेद शेख,प्राचार्य निजामोद्दीन शेख,संचालक पांचाळ सर,उपप्राचार्य जहागीरदार टी.ए.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते या समारंभात एकूण 22 विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून पाहूण्यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र स्विकारले व तदनंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.इनामदार एम.एम. व प्रा.सौ.गायकवाड व्ही.व्ही.यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.कोतवाल एम.एम.यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.