ग्रामीण भागात घरकुल मंजुरीची अफवा आधार प्रमाणीकरणच्या नावाखाली आर्थिक लूट

 ग्रामीण भागात घरकुल मंजुरीची अफवा 

 आधार प्रमाणीकरणच्या नावाखाली आर्थिक लूट





शिवाजी मोरे

औसा-सध्या औसा तालुक्यात पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत ड प्रमाणपत्र भरून आधार कार्ड प्रमाणीकरण करण्याच्या याद्या  ग्राम पंचायत कार्यालयामध्ये  लावण्यात आल्या होत्या परंतु त्याचा गैरफायदा घेत तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकाकडून लूट केली जात असल्याचाची चर्चा सध्या सुरू आहे.


सविस्तर माहिती अशी की,प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ड प्रमाणपत्राचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून तसे आदेश प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात आले होते यादीमध्ये नावे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे होते त्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे हे मुख्य उद्देश होता तो उद्देश बाजूला सारत तालुक्यातील अनेक गावात आधार प्रमाणीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट केली असल्याचे चित्र दिसून येत असून आधार प्रमाणीकरण करण्यासाठी 100 ते 200रुपये विना पावती फीस घेतल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लावण्यात आलेल्या याद्या कशाच्या आहेत व ग्रामपंचायतीला का पाठवण्यात आल्या याबद्दल नागरिकांना व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मागील वर्ष ते दीड वर्षापूर्वी ज्या लोकांचे नावे पंतप्रधान घरकुल आवास योजने मध्ये आली नव्हती अशा लोकांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्र पत्र "ड"भरून त्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी चा उपक्रम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे माध्यमातून सुरू आहे.पण याबाबत नागरिकात चुकीचा संदेश दिला जात असून त्या आडून मोठ्या प्रमाणात काही ग्राम पंचायत माजी सदस्य स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजून गरिबांची लूट केली जात आहे.यामध्ये अनेक पात्र व अपात्र असणाऱ्या नागरिकांना यामध्ये घरकुल मिळणार आहे अशी चर्चा सुरू आहेत.अनेकांची नावे यादीमध्ये आली आहेत.एकाच घरातील तीन ते चार व्यक्तींची नावे या यादीमध्ये आहेत त्यामुळे सर्वांनाच घरे मिळणार का?अनेकांच्या नांवावर नमुना आठ अ नाहीत,जागाही नाहीनुकतेच घरकुल बांधकांम केले आहे,काही अविवाहित आहेत,गावी राहत नाहीत अशी यादीमध्ये नाबे आहेत तर अनेकांना राहण्यासाठी घर नाही अशांना घरकुल मिळणार का?असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

याबाबतीत ग्रामपंचायत मधून व्यवस्थित खुलासा करणे गरजेचे असून यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे.


अनेक कमी बुध्दीचे राजकीय नेते मंडळींनी आपली पोळी भाजून घेण्यासाठी प्रशासनाने पाठवलेल्या यादयाचा आधार घेत अनेक ठिकाणी मी तुमचे नाव यादी मध्ये घातले असल्याचे आनंदाने सांगत आहेत.परंतु प्रत्यक्षात मात्र यामधून अनेक नागरिकांची नावे पात्र व अपात्र होणार आहेत त्यामुळे ही यादी अंतिम असून सदरील यादीमध्ये आधार फिटिंग करणे साठी पाठवण्यात आली आहे असे समजते. 


*आधार प्रमाणीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट*


तालुक्यातील अनेक गावांमध्ये आधार प्रमाणीकरण करण्याच्या नावाखाली अनेकांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट केल्याचे चर्चा सध्या तालुक्यात सुरू असून एक आधार प्रमाणीकरण करण्यासाठी कमीत कमी पन्नास ते शंभर रुपये घेतले असल्याची चर्चा सुरू असून अनेक गावांमध्ये जवळपास चारशे ते पाचशे जणांची यादी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या "ड"प्र पत्र मध्ये आले असल्याने प्रत्येकी विना पावती 50 -100 पैसे कशाला लागतात?पाचशेची यादी झाली तर प्रत्येक गावातून या कोरोणाची महामारी संपली नाही तोपर्यंत गावागावातून पन्नास हजार लाख रुपये जमा केले जात आहेत  इतका मोठा घोटाळा कसा?असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी संबंधित पंचायत समिती स्तरावरुन अशा पैसे विना पावती घेऊन आधार प्रमाणीकरण करणाऱ्या ऑपरेटर व संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार हे पाहणे गरजेचे आहे.

【   】आधार प्रमाणीकरण करण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस लागत नाही आणि आधार प्रमाणीकरण करणे हे मोफत करणे बंधकारक आहे.कोणीही कसल्याही प्रकारची फीस घेऊ नये अशा सूचना सर्व ग्राम सेवकांना दिल्या आहेत आणि जर कोणी काही फीस घेत असतील असे निदर्शनास आले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

--सूर्यकांत भुजबळ,

गट विकास अधिकारी,

पं स औसा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या