.माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांनी घेतला कोरोना उपाययोजनांचा आढावा स्थानिक लोकप्रतिनिधीशी प्रशासनाने समन्वय साधून प्रयत्न करावेत. निधीची कमतरता पडू देणार नसल्याची दिली ग्वाही


आ.संभाजी पाटील निलंगेकरांनी घेतला कोरोना उपाययोजनांचा आढावा 
स्थानिक लोकप्रतिनिधीशी प्रशासनाने समन्वय साधून प्रयत्न करावेत.
निधीची कमतरता पडू देणार नसल्याची दिली ग्वाही





निलंगा ः संपूर्ण देशाला कोरोना संसर्गाच्या प्रार्दुभावाने हादरून सोडले आहे. हा संसर्ग निलंगा मतदारसंघातही पोहचलेला असून मतदारसंघातील अनेकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. मात्र हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनासह वैद्यकीय अधिकार्‍यांकडून कोणत्या-कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याचा आढावा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेवून या संसर्गाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीशी समन्वय साधून युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात यावेत अशा सुचना देवून याकरिता आवश्यक असणार्‍या निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आ.निलंगेकर यांनी यावेळी दिली. तसेच मतदारसंघा अंतर्गत असलेल्या तीन्ही तालुक्यांच्या कोवीड केअर सेंटरसाठी प्रत्येकी 5 लाख रूपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली असल्याची माहिती आ.निलंगेकर यांनी यावेळी दिली. 
निलंगा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या तीन्ही तालुक्यात आता कोरोनाचा संसर्ग पोहचलेला आहे. या संसर्गाने बाधीत झालेल्या रूग्णांवर होत असलेले उपचार आणि संसर्गाचे उच्चाटन करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजना याबाबतचा आढावा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक तसेच तिन्ही तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व न.प.चे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती. 
या आढावा बैठकीत सध्या मतदारसंघात कोरोना संसर्गाने बाधीत झालेल्या रूग्णांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांच्यावर योग्यप्रकारे उपचार होतात की नाही याबाबत आ.निलंगेकर यांनी माहिती घेतली. तसेच सध्या हायरिस्क व लोरिस्क दोन पध्दतीतील किती रूग्ण उपचार घेत आहेत आणि यासाठी आवश्यक असलेली औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत का? याचाही आ.निलंगेकरांनी आढावा घेतला. कोवीड केअर सेंटरचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होते की नाही? याबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांनीही सजग राहून कोणताही निष्काळजीपणा करण्यात येवू नये असे निर्देश आ.निलंगेकर यांनी यावेळी दिले. कोरोना संसर्गाने बाधीत झालेल्या रूग्णांचा संपर्कात आलेल्या नागरिकांना ज्याठिकाणी अलगीकरण करण्यात येते तेथे सुविधा उपलब्ध आहेत का? याचा आढावा घेवून याठिकाणी कोणत्याही तक्रारीला वाव मिळू नये याबाबतही प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी सुचना आ.निलंगेकर यांनी यावेळी दिली. 
आगामी काळात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी केअर सेंटर कमी पडू नयेत असे स्पष्ट करून यासाठी नवीन ठिकाणी कोवीड केअर सेंटर उभारण्याकरिता प्रशासनाने चाचपणी करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ देण्यात यावा असेही आ.निलंगेकर यांनी यावेळी प्रशासनाला सांगितले. कोरोना संसर्गाबाबत नागरिकांचे अधिकाधिक प्रबोधन व्हावे याकरिता प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न करून संसर्गाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाने गरज पडल्यास सामाजिक संस्थांची मदत घ्यावी अशी सुचना यावेळी करण्यात आली. या आढावा बैठकीत कोरोनातून बर्‍या होणार्‍या रूग्णांचा दर आणखीन वाढला पाहिजे याकरिता विशेष उपाययोजना करून मृत्यू होवू नयेत याकरिताही वैद्यकीय यंत्रणेने विशेष दक्षता घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. या संसर्गाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे असून निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही आ.निलंगेकर यांनी यावेळी दिली. मतदारसंघाअंतर्गत असलेल्या तीन्ही तालुक्याकरिता कोरोना उपाययोजनांसाठी प्रत्येकी 5 लाख रूपयांचा निधीची मागणी करण्यात आलेली असून लवकरच हा निधी उपलब्ध होईल अशी ग्वाही आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिली.
ReplyForward

--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या