श्री गणेश विसर्जन निमित्ताने प्रसाद रुपात १००१ झाडांचे वाटप
ग्रीन लातूर वृक्ष टिमचा उपक्रम
लातूर जिल्हा व परीसरात सातत्याने वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन करणारया ग्रीन लातूर वृक्ष टिमने गणेश विसर्जनाच्या निमित्ताने महाप्रसादाच्या रुपात १००१ रोपांचे मोफत वाटप केले. आवळा, चिंच, बांबू, टिकोमा, जांभूळ या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.
बार्शी रोड दयानंद गेट परीसरात ग्रीन लातूर वृक्ष टिमने वृक्ष रुपी गणपती साकारला होता. गेल्या ९ दिवसात याठीकाणी १००० रोपांचे वाटप करण्यात आले. झाडांकरीता अधिकची मागणी पाहून आज अनंतचतुर्थीच्या निमित्ताने आणखी १००१ झाडे मोफत देण्यात आली.
यावेळी बार्शी रोड दुभाजकात टिकोमा वनस्पतीच्या ६०० शोभिवंत रोपांचे रोपन करण्यात आले.
स्त्रीरोग तज्ञ डॉ. कल्याण बरमदे, मनपा नगरसेविका सौ. श्वेता लोंढे, मनपा नगरसेवक इम्रानजी सय्यद, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली लोंढे यादव यांच्या हस्ते या रोपांचे वाटप करण्यात आले.
निसर्गाचे संवर्धन करण्याकरीता वृक्षरुपी गणपतीची स्थापना करुन झाडांचे संरक्षण करा, झाडांमध्ये देव पहा हा संदेश देण्यात येत आहे असे मत डॉ. कल्याण बरमदे यांनी व्यक्त केले.
उपक्रमाकरीता ग्रीन लातूरवृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा, प्रमोद निपानीकर, मनमोहन डागा, रुषिकेश दरेकर, पुजा निचळे, पद्माकर बागल. विकास कातपुरे, डॉ. भास्कर बोरगावकर, चैतन्य प्रयाग, नागेश स्वामी, सुलेखा कारेपुरकर, प्रफुल्ल भोसले, सार्थक शिंदे, रुषिकेश पोद्दार, शैलेश सुर्यवंशी, रणजीपटू आशिष सुर्यवंशी महेश गिल्डा, सिताराम कंजे, कल्पना कुलकर्णी, श्र्ध्दा नरवडे, गौरव पाटिल, गंगाधर पवार, शुभम आव्हाड, हितेश डागा, शैलेश पडगीलवार, द्वारकादास बिदादा, सचिन चांडक, जफर शेख, डॉ. मुश्ताक सय्यद, मोईझ मिर्झा, मुंडे, प्रसाद शिंदे, सुहास पाटिल, स्वाती यादव, प्रसाद श्रीमंगले यांनी परिश्रम घेतले. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणाला हातभार लागेल असे मत ग्रीन लातूर वृक्ष टिमचे, मनपा नगरसेविका सौ. श्वेता लोंढे यानी व्यक्त केल
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.