कोरोना सोबतच जगायचे आहे,काळजी घेणे गरजेचे-डॉ.आर.आर.शेख (तालूका आरोग्य अधिकारी,औसा).
औसा-आज आपला तालुका 666 वर जाऊन पोहोचला...आणि 15 मृत्यु..नक्कीच ही आपल्या सर्वांसाठी भूषणावह गोष्ट नाही...पण चिंता वाढविणारी नक्कीच आहे...यापुढे आपल्याला कोरोना सोबतच जगायचे आहे.. वारंवार हाथ साबनाने धुने किंवा Sanitizer चा वापर करने,मास्क वापरने, गर्दीच्या ठिकाणी जाने
टाळणे, किमान 3 फुटाचे अंतर ठेवणे..हे नियम पाळत.. परन्तु ह्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे...
मागील 3 दिवसात आपल्या तालुक्यात 62 रुग्ण पॉजिटिव सापडले त्यापैकी 40 औसा शहरातील आहेत..ही खूपच चिंतेची बाब आहे..
वेळ घालविन्यासाठी आणि पान तम्बाखू खाने साठी एकत्र येणे, मोठ्या प्रमाणात कार्यकर्मासाठी एकत्र येणे,बाजारात बिनधास्त काम नसताना फिरणे...ही मुख्य कारणं आहेत..हे करून आपण आपले सर्व कुटूंब धोक्यात घालत आहोत.. आपण वेळीच सावध नाही झालो तर भविष्यात परिस्थिती सुधारण्यापेक्षा बिघड़णार यात तिळमात्र शंका नाही..आरोग्य यंत्रणा आणि ईतर सर्व शासकीय यन्त्रणा आपल्या उत्तम आरोग्यासाठी मागील 5 महिन्यापासुन अहोरात्र काम करीत आहेच..आपल्या
सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा..धन्यवाद..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.