अभियांत्रिकी पदविका पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

 अभियांत्रिकी पदविका पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

 





हिंगोली,दि.1: शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता कोरोनाच्या प्रादुर्भावापासून विद्यार्थी व पालकांच्या सुरक्षिततेसाठी यंदा अभियांत्रिकी पदविका पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये मुख्यत: सर्व अधिकारी-कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी एसओपी प्रणालीचा वापर करुन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना दोन पध्दतीने (ई-स्क्रुटिनी व प्रत्यक्ष स्क्रुटिनी) अर्ज करता येणार आहे. ई-स्क्रुटिनीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक आणि इंटरनेट किंवा स्मार्ट फोनची सुविधा आहे. ते विद्यार्थी घरी बसून अर्ज करुन शकणार आहेत. शिवाय आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.याकरीता प्रवेश घेवू इच्छिणाऱ्यां विद्यार्थ्यांनी gphingoli.in आणि http://poly20.dtemaharashtra.org/diploma20 या लिंकचा वापर करुन आपला स्क्रुटिनीचा अर्ज भरावा. प्रत्यक्ष स्क्रुटिनीच्या माध्यमातून शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथे कार्यरत सुविधा केंद्रावर जाऊन मोफत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथे पदविका पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षाकरिता मेकॅनिकल इंजिनिअरींग 120 जागा, इलेट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग 60 जागा व कॉम्प्युटर इंजिनिअरींग 60 जागा तसेच टीएफडब्लूएस 9 जागा अशा एकूण 249 जागाकरिता व बारावी नंतरच्या थेट द्वितीय वर्षासाठी पदविका अभ्यासक्रमाच्या एकूण 30 जागांसाठी वरील कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

शासकीय तंत्रनिकेतन मधील प्रवेश प्रक्रिया 25 ऑगस्ट पासून राज्यात सुरु झाली असून 4 सप्टेंबर, 2020 पर्यंत चालू राहणार आहे. हिंगोली जिल्ह्याकरिता शासकीय तंत्रनिकेतन हिंगोलीचे प्राचार्य डॉ. रणजित सावंत यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अभियांत्रिकी पदविका तसेच औषध निर्माणशास्त्र पदविका साठी पूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. एसओपी प्रणालीचा वापर करुन विद्यार्थ्यांनी सोयीनुसार ई-स्क्रुटिनी व प्रत्यक्ष स्क्रुटिनी माध्यमातून आपला प्रवेश अर्ज भरावा असे आवाहन डॉ. अभय वाघ, संचालक तंत्रशिक्षण, मुंबई यांनी केले आहे.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या