घरपट्टी व पाणीपट्टी वरील थकीत बाकीवर व्याज व दंड रद्द करा .खुंदमीर मुल्ला इरफ़ान शेख यांची मागणी

 घरपट्टी व पाणीपट्टी वरील थकीत बाकीवर व्याज व दंड रद्द करा .खुंदमीर मुल्ला व इरफ़ान शेख ची मागणी 




औसा मुख्तार मणियार 

औसा शहरातील औसा नगरपरिषदे कडुन थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टीवरील व्याज 24% व्याज व दंड रद्द करावी अशी मागणी जन एकता संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख व सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला औसा यांच्या वतीने दि.१ सप्टेंबर २०२० मंगळवार रोजी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.औसा नगरपरिषदे कडुन औसा शहरातील मालमत्ता कर व पाणी पट्टीवरील थकीत बाकीवर २४% व्याज व दंड आकारणी करत आहे.सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गोर गरीब व मोलमजुरी करून उपजिविका भागवण्यासाठी संकटाचा सामना करावा लागत आहे.अशातच गोर गरीब व मोलमजुरी करून उपजिविका भागविणारे कुटुंबाना आर्थिक बोजा पडत आहे.यासाठी मा जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेला मालमत्ता कर व पाणी पट्टीवरील थकीत बाकीवर २४% व्याज व दंड रद्द करण्याचे आदेशीत करावे अशी मागणी जन एकता संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख व सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला औसा यांच्या वतीने जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर जन एकता संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख व सामाजिक कार्यकर्ता औसा खुंदमीर मुल्ला याच्या स्वाक्ष-या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या