राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्या बद्दल एल.सी.बी वरिष्ठ इन्स्पेक्टर दगुभाई शेख व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या सदस्यपदी डॉ.तबस्सुम सुलताना यांची निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न
उस्मानाबाद ( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी )
शम्स एज्युकेशन सोसायटी उस्मानाबाद संचलित शम्सुल उलुम उर्दू मा. व उच्च माध्यमिक विद्यालय व गुलशन हे अतफाल उर्दू प्रायमरी स्कूल उस्मानाबाद येथे राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्या बद्दल एल.सी.बी वरिष्ठ इन्स्पेक्टर दगुभाई शेख व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या सदस्यपदी डॉ.तबस्सुम सुलताना यांची निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न झाला. दगुबाई शेख यांचा सत्कार संस्था अध्यक्ष शेख लाईक अहमद अब्दुल रहिम यांनी शाल व बुके देऊन केला. तसेच डॉक्टर तबस्सुम सुलताना मॅडम यांचा सत्कार प्राचार्य काजी रेश्मा परविन मॅडम यांनी केला. तसेच ॲड. सरफराज शेख आणि समाजसेवक दानशूर व्यक्ती गफार भाई सिमेंट वाले यांचा सत्कार संस्था सचिव अहमद अहमद यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तबस्सुम सुलतान यांनी केले. यावेळी सत्कार मूर्ती व प्रमुख पाहुणे दगुभाई शेख यांनी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर यांनी केले तर आभार शेख आसिफ सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.