असदपुर ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा पूर आला !
येऊतकर दाळसिंबे चौधरीचा जांगडगुत्ता झाला !!
जिल्हाधिकारी व जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यवाही करतील का ?
*{ उषा पानसरे, जिल्हा प्रतिनिधी }*
असदपुर : दि. २७ - अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समिती मधील असदपुर ग्रामपंचायतीत सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक आणि अचलपुर पंचायत समितीमधील संबंधित विभागाचे कांही कर्मचारी यांनी संगणमताने फार मोठा भ्रष्टाचार केला असून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करून गुन्हे दाखल करावेत म्हणून असदपूर येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवरील मजूर आणि ग्रामस्थांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, खासदार सौ. नवनीत राणा, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देवुन झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
असदपुर ग्रामपंचायती अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत मनरेगाच्या वृक्ष लागवडीच्या कामावर मागील वर्षभरापासून असलेले मजूर कोरोनामुळे लॉकडाऊन च्या काळात त्या मजुरांना कामावरून घरी बसवण्यात आले मात्र प्रत्यक्षात काम चालू आहे असे दाखवून कामावर ५ ते ६ मजूर प्रत्यक्षात असायचे आणि कामावर नसलेल्या काही लोकांची नावे संबंधित मजुरांचे हजेरीपटावर त्यांचे नाव कामावर हजर असल्याचे दाखवून पैसे उचलले असल्याची तक्रार संबंधित मजुरांनी केली आहे. सरपंच आणि रोजगार सेवक यांच्या संबंधातील १० ते १२ लोकांची नावे प्रत्यक्षात कामावर नसतानाही त्यांना मनरेगाच्या कामावर दाखवले आहे. असदपुर च्या सरपंच ममता येऊतकर यांचे पती च्या भावाचे किराणा दुकान आहे. त्यांच्या नावाने फार मोठ्या पैशाची उचल करण्यात आलेली आहे. तसेच रोजगारसेवक हर्षद ज्ञानेश्वर चौधरी यांनी स्वतःच्या घरातील आणि नातेवाईकांनाच प्रत्यक्षात कामावर नसतानाही कागदोपत्री कामावर दाखवून मोठ्या प्रमाणात अफरातफर केलेली आहे. बोगस दाखवलेल्या मजुरांचे सर्व लोकेशनसह सविस्तर माहिती आणि पुरावे निवेदन देणार्यांच्याकडे असल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले आहे.
लॉकडाऊन मुळे खऱ्या अर्थाने ज्यांना मजुरी ची आवश्यकता होती अशा लोकांना काम न देता लाँकडाऊन चा गैरफायदा घेऊन स्वतःच्या घरातील मंडळी आणि नातेवाईकांना कामावर असल्याचे बोगस दाखवण्याचे काम सरपंच, रोजगारसेवक आणि ग्रामसेवक आर.बि.दाळसिंबे यांनी मिळून जांगडगुत्ता केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी रोजगार सेवकास निलंबित करून सक्षम अधिकारी नेमून सखोल चौकशी करावी आणि जे कोणी भ्रष्टाचारी असतील त्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच ज्यांच्या नावे बोगस पैसे दिले आहेत त्यांच्याकडून दिलेल्या पैशाची वसुली करावी अशी मागणी असदपूर येथील साहेबराव नितनवरे, नारायण खंडारे, रवींद्र नितनवरे, धर्मा वाकाडे, साहेबराव थोरात, पंकज नितनवरे, जीवन पातोड, दीपक भडके, गजानन वाघमारे, माधव माकोने, श्रीकांत गावंडे, संदीप बांगडे, गोपाळ काळे, मदन नागोराव बागडे, गणेश निबोळकर, देवानंद ताथोड, श्रीनाथ गावडे, रोशन गूरमाळे, सूरेन्द मोहड, अरूण पंचवटे, प्रदिप उके, धनंजय गाडगे, योगेश नितनवरे, नितीन भडके, अरूण वानखडे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह या निवेदनाच्या प्रति देण्यात आलेल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.