*शहीद भगतसिंग यांना अभिवादन.*
'इन्कलाब जिंदाबाद'च्या घुमल्या घोषणा.
{ जिल्हा प्रतिनिधी }
लातुर : दि. २८ - स्वातंत्र्यासाठी मृत्यूला कवटाळणारे, स्वातंत्र्य चळवळीतील युवक, क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्ताने इतिहासाला उजाळा देत 'इन्कलाब जिंदाबाद' शहीद भगतसिंग अमर रहे, शहीद भगतसिंग अमर रहे' च्या घोषणा देत शहीद भगतसिंग यांना अभिवादन करण्यात आले. युवकांच्या घोषणा परिसरात घुमल्या.
लातूर शहरातील 'आम्ही लातूरकर युवक कृती समिती' च्या वतीने साळे गल्ली येथे शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरीक सूर्यकांत येलगट्टे आणि राजाभाऊ गुंजोटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास ॲड. प्रदिपसिंह गंगणे, ताहेरभाई सौदागर, जितेंद्र बनसुडे, संदीप सुरवसे, बालाजी जाधव, जमाल्लोदीन मणियार, सूर्यकांत गवळी, ऋषिकेश क्षिरसागर आदींची उपस्थिती होती.
*- व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार.*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.