लातूर ते निलंगा विनाथांबा बस सेवा चालु करण्याची मागणी*

 *लातूर ते निलंगा विनाथांबा बससेवा चालु करण्याची मागणी* 





निलंगा :कोरोना या महामारी मुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील एसटी बसेस बंद होत्या परंतु टप्प्या टप्प्याने महामंडळांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार बसेस सुरू केल्या आहेत नुकतेच आलेल्या आदेशानुसार बसेस जिल्हा बाहेरही जात आहोत लोकडॉन पूर्वी लातूर ते निलंगा विनाथांबा बस दर पंधरा मिनिटाला होत्या परंतु आज हे विना विनाथांबा बससेवा बंद आहे त्यामुळे एसटी महामंडळाला याचा आर्थिक फटका बसत आहे कारण लातूर ते निलंगा दररोज बस प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याकारणाने तालुक्यातील नागरिक एसटीने खास करून विनाथांबा बसने प्रवास करणे पसंत करतात वेळेची बचत होत असल्यामुळे या लातूर ते निलंगा विना थांबा बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता निलंगा आगाराचे उत्पन्न ही याच मार्गावर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या मार्गावरील बंद झालेले विनाथांबा बससेवा पुन्हा चालू करावी अशी मागणी  प्रवाशी वर्गातून जोर धरत आहेत किमान सकाळच्या सत्रात सकाळी आठ ते अकरा पर्यंत दोन्ही ठिकाणी म्हणजे निलंगा व लातूर बस स्थानकातून येथून ही सेवा सुरू करावी अशी मागणी आहे व लातूर शिवाजी चौक येथे या बसला थांबा देण्यात यावा व व संध्याकाळी निलंगा ते लातूर जाणारी बस सेवा आहे शेवटची बस साडे सात पर्यंत असून त्याचे वेळ वाढून साडेआठ करण्यात यावे अशी मागणी होत आहे त्यामुळे या सेवेमुळे निलंगा आगाराला आर्थिक फायदा होणार आहेत त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून बंद झालेले सेवा पुन्हा सुरू करावी व महामंडळाचे उत्पन्न हे वाढवावे अशी मागणी आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या