पंडित सुंदरलाल कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करा :एम आय एम ची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा येथे आज दिनांक 15 सप्टेंबर 2020 मंगळवार रोजी एम आय एम पक्षाच्या वतीने पंडित सुंदरलाल कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी अशी मागणी औसा तहसीलदार मार्फत माननीय राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांना एका निवेदनाद्वारे केलेली आहे या निवेदनात सन 1948 हैदराबाद संस्थान भारतात विलनीकरण झाल्यानंतर पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य मुस्लिम समाजाचे समुदायाचे संभाव्य झालेले नुकसान आणि हिंदू-मुस्लीम धार्मियात निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर तात्कालिन केंद्र सरकारने मा.पंडित सुंदरलाल कमीटीची स्थापना केली होती. या कमीटीने हैदराबादसह मराठवाडा विभागाचा दौरा करून केंद्राला आपला अहवाल सादर केला होता. सदर अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. पंडित सुंदरलाल कमीटीनी केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी हैदराबाद संस्थान १९४८ मध्ये भारतात सामिल झाले त्या काळात केंद्र सरकारने पोलिस अॅक्शन कारवाई केली.या कारवाईच्या काळात समाज कंटकाकडून मुस्लिम समाजाच्या जिवीताचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. असंख्य महिलांवर अत्याचार झाले.अंध, अपंग, निराधार महिलाही त्यामधून सुटल्या नाहीत. मुस्लिम समाजातील दुकाने लूटण्यात आली,सोने चांदी अशी संपत्ती पळविण्यात आली.असंख्यजण बेवारस झाले अशा कुटुंबाच्या व्यक्तीचा शोध घेण्यात यावा. त्यांच्या वारसांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी,त्यातील दोषींच्या नावे असलेली संपत्ती जप्त करुन नुकसान झालेल्या पिडीतांना आर्थिक मदत द्यावी.अशी मागणी आम्ही मागिल १० ते १२ वर्षांपासून करित आहोत, परंतु अद्याप त्यावर कहीही कार्यवाही झालेली नाही याअनुषंगाणे.पंडित सुंदरलाल कमीटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावीअशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने औसा तहसिलदार मार्फत भारताचे राष्ट्रपती मा रामनाथ कोवींद यांना एका निवेदनाद्वारे केलेली आहे.यावेळी एम आय एम पक्षाचे नेते अॅड गफुरुल्ला हाशमी,एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, इलियास चौधरी, शेख नय्युम,नियामत लोहारे,सय्यद फजले रहीम, शेख सिराज आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.