*निलंगा तालुक्यात कोरोनाचे* *1140 रुग्ण रुग्ण*
*शहरापेक्षा ग्रामीण भागातील रुग्ण संख्या दुपटीपेक्षा अधिक*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्के*
( *मोईज सितारी*)
निलंगा: तालुक्यातील कोरोना चा कहर वाढला असून प्रशासनाने दिलेल्या सूचना बगल देत गर्दी वाढत असल्याने कोरोना रुग्णसंख्या शहराबरोबरच ग्रामीण भागात ही मोठ्या संख्येने वाढली आहे मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निलंगा तालुक्यात 78% पेक्षा अधिक आहे निलंगा तालुक्यातील कोरोनाने एकूण 46 जणांचा बळी घेतला आहे
निलंगा तालुक्यातील कोरोना संक्रमित रुग्णसंख्या दिनांक 15 सप्टेंबर रोजी 1140 एवढी झाली आहे यातील शहरातील 330 तर ग्रामीण भागातील 810 एवढे रुग्ण आहेत
शहर व तालुक्यातील एकूण 1140 रुग्ण संख्येपैकी 894 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 46 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर मृत्युदर हा 4 टक्के एवढा आहे आज घडीला निलंगा शहरात ॲक्टिव रुग्णसंख्या 27 तर ग्रामीण भागातील ऍक्टिव्ह संख्या 173 असे एकूण तालुक्यात 200 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत
प्रशासनाने घालून दिलेले नियमाला बगल देत शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक बिनधास्तपणे मार्केटमध्ये फिरत असल्याचे दिसून येत आहे सोशल डिस्टेंसचे पालन न करता सगळीकडे व्यवहार चालू आहे विना मास्क फिरणाऱ्याची संख्याही अधिक आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.