कांद्यावरील निर्यातबंदी ताबडतोब परत घेऊन
कांदा उत्पादकांना दिलासा देणे आवश्यक
ना. अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी : १५ सप्टेंबर २०:
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा हे उत्पादन जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणाऱ्या केंद्र शासनानेच आता कांद्यावर निर्यातबंदी घालण्याचा अनाकलनीय निर्णय घेतला आहे. हा निर्णय ताबडतोब परत घेऊन कांदा उत्पादकांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख योनी केले आहे.
कोणतीही पूर्वकल्पना न देता सोमवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय तडकाफडकी जाहीर केला आहे. या निर्यातबंदी मुळे भाववाढ होण्याची वाट पहात थांबलेल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. उन्हाळ्यात कांद्याचे भाव पडलेले असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री न करता साठवणूक करून ठेवली होती. यातील बराच कांदा पावसामुळे सडून गेला आहे. या अवस्थेत आता पुन्हा कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव एकाच दिवसात २५% टक्क्यावर आले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग खूप मोठ्या अडचणीत आला आहे. निर्यातबंदी करण्यासारखी परिस्थिती नसताना केंद्र सरकारने असा निर्णय का घेतला ही बाब अनाकलनीय आहे. अनेक संकटामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने ही निर्यात बंदी ताबडतोब परत घ्यावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख योनी केली आहे.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.