दिव्यांग व्यक्तीची प्रशासनात दखल घेतली जाणार का ? दिव्यांग मिनाहाज शेख यांची मागणी

 दिव्यांग व्यक्तीची प्रशासनात दखल घेतली जाणार का



?दिव्यांग मिनाहाज शेख यांची मागणी

 औसा मुख्तार मणियार

औसा शहरातील कालन गल्ली येथील रहिवासी दोन्ही पायांनी अपंग व्यक्ती शेख मिनाहाज मुखतार यांना उद्योग व्यवसाय करुन आपली उपजीविका भागविण्यासाठी पंचायत समिती औसाच्या आवारात समान संधी हक्काचे संरक्षण अधिनियम १९९५ (१९९६) या अधिनियम क्रमांक १ यांच्या कलम १३ नूसार २०० चौरस जागा उपलब्ध करून द्यावी. या मागणीसाठी दि.१ सप्टेंबर २०२० मंगळवार रोजी लातूर चे पालकमंत्री अमीत विलासराव देशमुख यांच्या कडे मिनाहाज शेख यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.मिनाहाज शेख यांना एक पत्नी व दोन मुले आहेत.मला कॅम्प्यूटर डाटा, एंट्री ऑपरेटर, अॉनलाईन वर्क व कॅम्प्यूटर हार्डवेअरचे संपूर्ण ज्ञान आहे.मला माझी व माझ्या कुटुंबाची उद्योग व्यवसाय करुन आपली उपजीविका भागविण्यासाठी पंचायत समिती औसाच्या आवारात समान संधी हक्काचे संरक्षण अधिनियम १९९५(१९९६) चा अधिनियम क्रमांक १ यांच्या कलम १३ नुसार २०० चौरस जागा उपलब्ध करून द्यावी व मला माझे जीवन स्वाभिमानाने जगण्याची संधी द्यावी असे मागणीचे पत्र मागील वरील संदर्भानुसार ९ वर्षांपासून ५ वेळेस जिल्हाधिकारी कार्यालय लातूर व पंचायत समिती औसा यांच्याकडे मागणी करत आहे.पण आज रोजी पर्यंत माझ्या मागणीची व पत्राची कोणीही दखल घेत नसल्याने आज माझ्या व माझ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.पालकमंत्रीना माझी विनंती आहे या बाबींचा विचार करून माझ्या मागणीकडे माणुसकीच्या दृष्टीकोनातून दखल घ्यावी व मला न्याय मिळवून द्यावा अशी मला अपेक्षा आहे.अशी मागणी पालकमंत्री अमीत विलासराव देशमुख यांच्याकडे मिनाहाज शेख यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या