औसा नगर परिषदेला प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पाच कोटी रु निधी वितरित करण्यात यावा .
नगरसेविका अॅड.सौ मंजुषा हजारे
औसा मुख्तार मणियार
औसा नगर परिषदेतील प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन डीपीआर मंजूर आहेत त्यामधून केवळ पहिल्या डीपीआर मधील 116 लाभार्थ्यांचे प्रत्येकी एकूण एक लक्ष रुपये प्रमाणे अनुदान नगर परिषदेला प्राप्त झाले, व दुसऱ्या डीपीआर मधील 129 लाभार्थ्याचे एकही रुपये अनुदान आले नाही, लाभार्थ्यांनी त्यांची राहती कच्ची घरे व झोपड्या पाडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांचे बांधकाम चालू केले आहेत ,अनेक लाभार्थी उघड्यावर आहेत ,व अनेक परिवारांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे, घरभाडे देण्याची त्यांची क्षमता नाही, व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार ने केलेल्या लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य जनतेची परिस्थिती अतिशय हलाखीची बनली आहे ,तरी औसा नगरपरिषदेला प्रधानमंत्री आवास योजनेचा अंदाजित पाच कोटी रुपये निधी वितरीत करण्यात यावा, जेणेकरून सर्वांची घरे बांधून पूर्ण होतील, व शहरातील गोर गरीब लाभार्थ्यांचे हाल होणार नाहीत ,असी मागणी स्थानिक नगरसेविका
अॅड. सौ मंजुषा हजारे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पत्राद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.