जिल्ह्यात पहिले न्युरोलॉजिस्टचा मान डॉ. नवलेंनी मिळवला कर्नाटकमध्ये सर्वाधिक गुण घेऊन उत्तीण, कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील शेतकरी पुत्राची भरारी, उस्मानाबादेत लवकरच होणार कार्यरत
उस्मानाबाद ( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) जिल्ह्यातील
कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील शेतकरी कुटूंबातील डॉ. निखिल नवले हे जिल्ह्यातील पाहिले न्युरोलॉजिस्ट होण्याचा मान मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात न्यूरोेलॉजी या विषयावर बोर्डाची परिक्षा घेतली होती. या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत डॉ. निखिल नवले हे विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले. त्यांनी या परीक्षेत कर्नाटमधील सर्वोच्च गुण मिळवले आहेत. ते या पुढे मायभूमीतच रुग्णांची सेवा करणार असल्याने, त्यांचा फायदा रुग्णांना होणार आहे. जन्मभूमीप्रती असणारे प्रेम व शेतकरी आणि कष्टकरी रुग्णाच्या सेवेकरता काम करण्याचे त्यांनी ठरविले आहे. ते उस्मानाबाद येथे लवकरच कार्यरत होत आहेत. त्यांचे उच्च शिक्षण हे भारतातील नावाजलेल्या बंगलोरमध्ये झाले. तिथे त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गुरु लाभले. त्यांनी काहीकाळ आशियातील सर्वात मोठ्या न्युरो सायन्स सेंटरमध्येही काम केले. तिथे त्यांनी लहान मेंदू याचा माणसाचा प्रज्ञा शक्तीवर असणारा परिणाम याच्यावर संशोधन केले. त्यांचा शोधनिबंध हा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. भारतामध्ये अश्याप्रकारे करण्यात आलेला पहिलाच संशोधन असावे. तिथे त्यांनी अर्धांगवायू, अपस्मार, झटके, मेंदू ज्वर, कंप वात, स्मृती ब्रंश, म्यास्थेनिया ग्रविस, निरोपॅथी, म्योपॅथी, परापलेजिया आदी विविध आजाराने पीडित असलेला रुग्णांचे निदान व उपचार केले. त्यांनी त्यांचा एम. डी. जनरल मेडीसिन ही डिग्री भारतातील पहिल्या तीन क्रमांकात असलेल्या आर्मड् फोर्सेस वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे केले. 2012 मध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत ते देशात 13 आले होते. महाराष्ट्रामधून तिथे मेडीसिनला फक्त तीन डॉक्टरच निवडले होते. त्यांना महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक व नवी दिल्ली इथे ही काम करायची संधी होती. परंतू भारतीय लष्करात काम करायची इच्छा असल्याचे त्यांनी त्यांचा कुटुंबाला बोलून दाखवली व कुटुंबातील सर्वजण ही तयार झाले. एफ.एम.सी पुणे इथे बौद्धिक तसेच शरारिक तयारीला सुरूवात झाली तिथेही त्यांनी आपली छाप पाडली. तिथे त्यांनी एच.आय.व्ही. बाधित सैनिकांचा अनिमियावर संशोधन केले. तिथे असताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवरचा परिषदेमध्ये पोस्टर प्रदर्शन केले. 2012 रोजी कामावरून घरी जात असताना पुण्यातील परिसरात त्यांचा मोटारसायकलचा अपघात झाला. त्यांना हाथ पाय कंबर खुबा फासळ्या यांना गंभीर जखम झाली होती. हेल्मेट घातले असल्यामुळे मेंदूला जास्त हानी नव्हती पोचली. त्यांना पुण्यातील जेहांगिर व कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. अपघातानंतर अर्धा डझन शस्त्रक्रिया करून येथील डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवले. नंतर काही दिवसांनी जेव्हा त्यांना शुध्दी आली आणि झालेला प्रकार कळला त्यावेळेस ते पार कोलमडून गेले. त्यांचा उजवा हात निकामी झाला होता व तो काम करणे अशक्य होते. स्वतः डॉक्टर असल्याने त्यांना त्यांची वस्तुस्थिती लगेच लक्षात आली. आता सर्व संपले आहे अशी धारणा झाली. परंतु कुटुंबातील सदस्य आणि मित्र मंडळी याने धीर द्यायचा काम केले. ऐ.फ.एम. सी.तील सर्व सहकारी व उच पदस्थ अधिकारी ही जातीने त्यांचा प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. यावेळी सर्व अधिकार्यांनी खूप सहकार्य केले. त्यांना पुन्हा नव्याने सरूवात करण्याची प्रेरणा दिली. अपघातामुळे आलेल्या विकलांगतेमुळे ते भारतीय सेनेत रुजू होऊ शकले नाहीत. व त्यांचं देश सेवेचं स्वप्नं अपुरे राहिले. तरीही सामान्य रुग्ण सेवा ही तितकीच महत्त्वाची असून ती सुरू करण्याची प्रेरणा त्यांचा सेनेतील उच्चअधिकरी यांनी व्यक्त केली. त्यांनी एम.बी.बी.एस. ही पदवी कोल्हापूर येथे पूर्ण केली. त्यांनी कोल्हापूरजवळील शाहूवाडी तालुक्याततील कळे कुडित्रे या दुर्गम भागात रुग्णसेवेचे काम केले. तालुक्यातील वडगाव ज. येथील शेतकरी व वारकरी कुटुंबात जन्मलेल्या बिभीषण भीमराव नवले व सौ कमलताई नवले यांचे ते कनिष्ठ चिरंजीव आहेत. नवले यांचे पहिलीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांनी प्रथम पाच क्रमांकमध्ये राहण्याचा मान मिळाला. त्यानंतर दयानंद महाविद्यालय सोलापूर इथे प्रवेश घेतला. आई कमल नवले ह्या वडगाव जहागीरचा विद्यमान सरपंच आहेत. त्यांचे थोरले बंधू निलेश नवले हे अमे रिकेत संगणक अभियंता म्हणून दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचा भगिनी स्वाती नवले ह्या महिला व बालविकास खात्यात पुणे येथे अधिकारी आहेत. त्यांचा पत्नी डॉ. प्रियंका नवले ह्या सध्या सोलापूर येथील काम करत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.