दि.९.९.२०२० रोजी इंडियन असोसिशन ऑफ लॉयर,लातूर च्या वतीने वकिलांच्या महत्वपूर्ण मागणीसाठी जिल्हा न्यायालाया समोर तसेच तहशील कार्यालया समोर निदर्शने करण्यात आले.लॉकडाऊन काळात बहुसंख्य वकिलांची अवस्था अत्यांत बिकट होती अनलॉक च्या सुरू झाल्यावर ही आणखीन बिकट झालेली आहे.न्याय व्यस्था बंद असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम समाज व्यवस्थेवर झालेला आहे.वकिलांना इतर कोणताही व्यवसाय करता येत नाही वकिलीवर कुटुंब अवलंबून असते परंतु दुर्दवाने वकिलांच्या प्रश्नाकडे शासन न्याय व्यवस्था आणि वकिलांच्या परिषदा लक्ष देत नसल्यामुळे इंडियन असोसिशन ऑ फ लॉयर च्या वतीने पूर्ण वेळ न्यायालयीन कामकाज सुरू करावे वकिलांना कोविड योद्धा चा दर्जा देऊन पन्नास लाखाचा विमा संरक्षण द्यावे न्यायालय बंद असे पर्यंत वकिलांना दर महा १५००० मानधन द्यावे कोविड संक्रमित वकील व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना उपचारासाठी ५लाख आर्थिक मदत द्यावे.व महत्वाच्या मागणीसाठी आज रोजी लातूर जिल्हा न्यायालाया समोर व तहशील कार्यालया समोर निदर्शने करण्यात आले.यावेळी वकिलांनी मागणीचे फलक हातात घेतले होते.शासनाने व उच्च न्यायालयाने वेळीत दखल घेऊन वकिलांच्या न्याय मागणीची सोडवणूक न केल्यास पुढील काळात वकिलांना सलदशील मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.या आंदोलनात लातूर वकिल मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.