भादा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके भुईसपाट
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील भादा व परिसरात सोमवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी आणि मंगळवारी पहाटे अचानक झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचा ऊस ज्वारीचे पीक आडवी झाली आहेत.यामुळे आर्थिक मणका मोडला आहे.असे भादा परिसरात दिसत आहे.मंगळवार रोजी अचानक काही क्षणातच जोराचा वारा आणि पाऊस झाला या पावसामुळे शेकडो ेहेक्टरवरील अनेक शेतकऱ्यांचा ऊस व ज्वारीचे पीक आडवी झाली आहे .या उसासह सध्या चांगल्या दर्जाचे उत्तम सोयाबीन मुग हे उंच पिकेही जमीनदोस्त झाले आहे आणि हा विध्वंसक पाऊस हा ३३ मी मी झाला असून रोजी पिकांच्या नुकसानीबाबत तलाठी कार्यालय भादा यांना कोणीही लेखी किंवा तोंडी माहिती दिली नसल्याचे त्या कार्यालयातून समजते तर भादा, बोरगाव, भेटा, आंदोरा, जायफळ आणि या भागामध्ये चांगला ऊस पिकाचे आडवे पडून उत्पन्नात तूट नक्कीच येणार आहे. हे मोठे नुकसान झाल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली आहे याच शिवारात भादा ते येलोरी रस्त्यावरील पूलावरील भराव वाहून गेल्याने हा फुल उघडा पडला आहे. तर भादा शिवली रस्ता दलदलमय होतो यामुळे या रस्त्याने जाणारे अनेक शेतकरी यांची जाण्याची वाट बंद झाल्याने शेतकरी आणि शेतकऱ्यांचे पशुधन यांनाही ही या रस्त्याने जाता येत नाही अशी गैरसोय गेल्या चार पाच वर्षापासून होत आहे .परंतु याकडे कोणत्याही स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पुढाऱ्यांचे लक्ष नाही यामुळे शेतकरी दैनंदिन त्या रस्त्याने जाताना पुढारी आणि प्रशासनाला शिव्या घालूनच तो रस्ता अनेक शेतकरी आपला खरा अनुभव बोलून दाखवतात अशी रस्त्याची दुरवस्था रस्त्याची झाली आहे तर काही प्रमाणात हा पाऊस विध्वंसक असला तरी या पावसाने मात्र सोयाबीनवर हायब्रीड, पिवळा, सूर्यफूल ,कारळ या पिकांना अगदी काही प्रमाणात जीवदान मिळाले असे शेतकरी बोलत होते कसाबसा पंदाकृत करतात असे दिसत होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.