मंडप हॉल लाँसच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या असन क्षमतेची परवानगी किंवा पर्यायी 500 व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी द्या

 मंडप हॉल लाँसच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या असन  क्षमतेची परवानगी किंवा पर्यायी 500 व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी द्या 





औसा_  इंडिया टेंट डीलर वेलफअर्स  ऑर्गनायझेशन नवी दिल्ली, सलग्न ऑल महाराष्ट्र डीलर वेलफअर्स ऑर्गनायझेशन व संपूर्ण  भारतातील शाखेची बैठक दिनांक 4 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आली, चर्चेअंती केंद्र सरकारच्या राहत पॅकेज देण्याच्या संदर्भातील विषयानुसार चर्चा होऊन या पॅकेजमध्ये होस्पितलिटी आणि इत्यादी क्षेत्रातील कोरोणाने प्रभावित व्यवसायांना सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार मदत करण्याच्या विचाराधीन आहे, तेव्हा आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो,  महाराष्ट्रातील संबंधित व्यवसाय धारकांना मदत करावी ही विनंती ही केली आहे ,व कोरोना विषाणूच्या महामारी मुळे देश व देशांतर्गत व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे ,त्या अंतर्गत सामाजिक वैवाहिक धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली त्यामुळे टेंट, मंडप, केटरिंग ,बॅक्वेट हॉल, डीजे ,साउंड लाईट ,डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आहेत, तरी प्रशासनाने या सर्व विषयाचा विचार करून मंडप कार्यालय हॉल लॉन्सच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी किंवा पर्यायी 500 व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी ,असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे, यावेळी सिद्धेश्वर सूर्यवंशी, गणेश कुलकर्णी, रवी नेटके ,दीपक सरवदे ,खंडू साळुंखे, हिरामण जाधव, अविनाश हरणे, विकास वाघमारे हे उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या