मनरेगातून गावाचा विकास साधणारा औसा पॅटर्न तयार करणार - आ. अभिमन्यू पवार

 मनरेगातून गावाचा विकास साधणारा औसा पॅटर्न तयार करणार - आ. अभिमन्यू पवार 








मनरेगा अंतर्गत कामे मंजूर करून गाव निहाय हाती घ्यावीत 





आमदार अभिमन्यू पवार व जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न. 






औसा - मनरेगातून गावाचा विकास कसा साधायचा याबाबत मनरेगातून गाव पातळीवर कोणती कामे झाली पाहिजे या योजनेतून शेतकऱ्यांना विविध योजनेचा जास्तीत जास्त लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्यावर भर देत मनरेगा अंतर्गतची कामे मंजूर करून गाव निहाय हाती घेवून मनरेगातून गावाचा विकास करणारा औसा मतदार हा नवीन पॅटर्न पुढे आला पाहिजे अशी भूमिका आमदार अभिमन्यू पवार यांनी दि.३० सप्टेंबर रोजी लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मांडली. 






        जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला औशाचे आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,उपजिल्हा अधिकारी प्रदीप कुलकर्णी,भाजपचे नगरसेवक सुनील उटगे, जिल्हा कृषी अधिकारी गावसाने,उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके,औशाचे तहसीलदार शोभा पुजारी, निलंगा तहसीलदार ताकभाते, औशाचे गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, निलंगा गटविकास अधिकारी गणेश जाधव,सामाजिक वनीकरण अधिकारी गंगावणे,वनाधिकारी रामपुरे आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मनरेगा अंतर्गत वैयक्तीक व सार्वजानिक स्वरूपाची कामे हाती घेणे,मजुरांच्या कामांचा कृती आराखडयाचे नियोजन करणे,नरेगा अंतर्गत संपूर्ण कामे पूर्ण करणे व प्रलंबित कामे निकाली काढणे आदीसह अन्य प्रमुख विषयावर हि आढावा बैठक झाली. मनरेगातून प्रामुख्याने जनावरांना गोटा,शेतरस्ते, स्मशानभूमीला जाणारा रस्ता, कंपार्टमेंट बिल्डींग आदीसह अन्य कामावर भर देवून मनरेगातून विकास साधणारा औसा विधानसभा मतदारसंघ हा नवीन पॅटर्न तयार करण्यासाठी या कामांना प्रामुख्याने हाती घ्यावे अशी भूमिका आमदार अभिमन्यू पवार यांनी मांडली. 





गोटा कामासाठी गावपातळीवर कुशल /अकुशल कामांचे नियोजन ६०-४० फाॅम्युला अंतर्गत राबविण्यासाठी गोटा मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अकुशल कामांचा अधिकचा भाग असलेल्या बांधावर वृक्ष लागवड करणे, कंपार्टमेंट बिल्डींग, विहिरीचे गाळ काढणे, बिहार पॅटर्न राबवणे, मनरेगा अंतर्गत फळबाग योजना राबवणे आदीपैकी एखादी योजना गोटा योजना संलग्न मंजूर करून औसा विधानसभा मतदारसंघात मनरेगाचा वेगळा पॅटर्न प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यात यावी अशी भूमिका आ. अभिमन्यू पवार यांनी या बैठकीत मांडली गावातील शेतरस्ते, अंगणवाडी बांधकामे व इतर बांधकाम, शेतरस्ते,वृक्ष लागवड, कृषी विभाग अंतर्गत कामे,वनविभाग अंतर्गत कामे,सामाजिक वनीकरण अंतर्गत कामे, स्मशानभूमीस जाणारे रस्ते, गाव अंतर्गत रस्ते, जल पुनर्भरण व अन्य योजनेचा कृती आराखडयात समावेश करण्यात यावा अशीही चर्चा या बैठकीत झाली सदरील बैठकीत झालेल्या विषयावर काय काम झाले याबाबत येणाऱ्या ३० आॅक्टोबरला पुन्हा आढावा बैठक घेवून या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. मनरेगातून गावाचा विकास हि संकल्पना राबविण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी या अगोदर सरपंच, उपसरपंच यांची झुम अॅपव्दारे बैठक घेत.याबाबत औसा प्रशासनाबरोबर हि बैठक घेतली होती. यानंतर आता जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्यासोबत आढावा बैठक घेवून मनरेगा अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा व निर्णय घेण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या