नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत द्या- भाजपची मागणी...
औसा मुख्तार मणियार
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकर्यांच्या उडीद, मुंग, सोयाबीन इत्यादी पिकात पाणी गेल्यामुळे खरीप हंगाम हातातून गेल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अर्ज, पिकांचे फोटो काढण्याच्या अटी रद्द करून सरसगट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी औसा तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे. भीज पावसामुळे शेतकर्यांच्या उभ्या पिकाला मोड फुटून खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकनुकसानी साठी अर्ज, सातबारा, 8-अ, पिकांचे फोटो यासह 72 तासात अर्ज करण्याची जाचक अट रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तहसीलदार औसा यांना भाजप कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर दीपक चाबुकस्वार, धनंजय परसने, राम कांबळे, बाबा पवार, सुमित भोसले, सलीम पठाण, गंगाधर शिंदे, के एस जाधव, रवी धुमाळ, रमाकांत सरवदे यांच्या सह्या आहेत....
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.