औसा शहरातील दर आठवडी रविवारचा भाजीपाला बाजार सुरू करा;एम आय एम ची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील दर आठवडी भाजीपाला बाजार सुरू करा अशी मागणी एम आय एम पक्षाच्या व भाजीपाला व्यापा-याच्या वतीने आज दिनांक 15 आॅक्टोंबर 2020 गुरुवार रोजी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात औसा शहरातील मागील वर्षानुवर्षे चालणारा रविवारचा भाजीपाला बाजार सुरू होता.कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे गेल्या 22 मार्च पासून दर रविवारी भाजीपाला बाजार बंद करण्यात आले आहे.ते सोशल डिस्टंसचा नियम घालून सुरू करण्यात यावा.यामुळे शहराच्या जुन्या भागात पूर्वी प्रमाणे किल्ला मैदानावर बाजार भरण्यास परवानगी देण्यात यावी व बाजार बंद असल्यामुळे अनेक व्यापा-याचे जसे कापड व्यापारी, भाजीपाला विकणारे शेतकरी,शेती साहीत्य विकणारे व्यापारी यांचे व्यापार बंद असल्यामुळे यांचे हाल होत आहे.तसेच शेतकऱ्यांकडून भाजीपाला कमी दरामध्ये मिळत असल्यामुळे जनतेचाही फायदा होणार आहे.त्यात तालुक्यातील लामजना, किल्लारी,गुबाळ, उजनी,बेलकुंड या गावाचा आठवडी बाजारांचा समावेश आहे.तरी औसा शहरातील आठवडी भाजीपाला बाजार रविवारीच सुरू करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर एम आय एम चे अॅड गफुरुल्ला हाशमी,सय्यद मुजफ्फर अली इनामदार, भाजीपाला मार्केट चे अध्यक्ष नजीर बागवान यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.