औशाचा आठवडी बाजार सुरू करा- एमआयएम प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार

 औशाचा आठवडी बाजार सुरू करा- एमआयएम प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार 



एस ए काझी 


औसा प्रतिनिधी/- कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे दि. 22 मार्च 2020 पासून औसा येथील भाजीपाल्याचा आठवडी बाजार बंद असल्याने सर्वसामान्य भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कष्टाने पिकवलेला भाजीपाला कमी दराने देण्याची वेळ आली आहे. परिणामी आर्थिक संकट व नैसर्गिक संकटांशी तोंड देणाऱ्या शेतकरी वर्गाचे नुकसान होत असल्याने आठवडी भाजीपाला बाजार तातडीने सुरू करावा अशी मागणी एमआयएम पक्षाचे मुजफ्फरअली इनामदार यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद औसा यांना निवेदन देवून केली आहे. आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी भाजीपाला बाजार सुरू करावा अशी मागणी करण्यात आली असून निवेदनाची प्रत औसा तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे. या निवेदनावर नजीर बागवान यांच्यासह कार्यकर्त्यांचे सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या