ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत करा - आ. अभिमन्यू पवार
औसा मुख्तार मणियार
अतिवृष्टीने उध्दभवलेल्या परिस्थितीची औशाच्या आमदारांनी दिली उपमुख्यमंत्र्यांना माहिती.
औसा - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्य़ासह औसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवर संपर्क साधून दिली असून औसा मतदारसंघची हवाई पाहणी करित ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.या मागणीचे समर्थन करित उपमुख्यमंत्र्यांनी हि मागणी रास्त असून आपण संपूर्ण परिस्थितीचा आढावा हवाई पाहणी व्दारे घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी आ.पवार यांना दिले आहे.
यंदा जिल्ह्यासह औसा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी, पावसाने उघाड दिल्यामुळे बी न भरणे, त्यात पुन्हा करपा रोग पडून नुकसान, काढणीपूर्व झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी बी कुजले तर काही ठिकाणी उभ्या पीकावर कोंब फुटले अशा संकटांचा सामना करावा लागला. या सगळ्यातून जे काही वाचलेले त्या सोयाबीनच्या बनमी २ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेल्या आहेत किंवा बनीम भिजून उरलेसुरले सोयाबीन खराब झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ही आपात्कालीन परिस्थिती आहे.या भीषण परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मानसिक दिलासा देणे आवश्यक आहे.यामुळे या सर्व परिस्थितीचा आढावा घेत आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधत या सर्व परिस्थितीचा माहिती देत मतदार संघात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडली.तसेच या परिस्थितीची चाॅपरव्दारे हवाई पाहाणी करुन लातूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांचे वीज बील व पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे.यावर उपमुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळाची मागणी रास्त असल्याचे सांगून हवामान खात्याकडून परवानगी मिळाल्यावर हवाई पाहाणी करण्याचे आश्वासन दिले आहे. याचबरोबर आ. अभिमन्यू पवार यांनी राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रधान सचिव यांच्याशी याबाबत फोनवरून संपर्क साधत अतिवृष्टीने जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली आहे.
एकंदरीत संपूर्ण मराठवाडयावर आभाळ फाटले असून शेतकरी यामुळे प्रचंड अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने अर्थिक मदत द्यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आ. अभिमन्यू पवार यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.