नॅशनल उर्दू हायस्कूल परभणीत वाचन प्रेरणा दिवस साजरा*

 

*📚नॅशनल उर्दू हायस्कूल परभणीत वाचन प्रेरणा दिवस साजरा*








*परभणी* नॅशनल कॅम्पस स्थित आझाद एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटी द्वारा संचलित नॅशनल उर्दू हायस्कूल परभणी मध्ये १५ ऑक्टोबर २०२० गुरुवार रोजी पूर्व राष्ट्रपती भारतरत्न *डॉ .ए. पी. जे. अब्दुल कलाम* यांचा जन्म दिन *वाचन प्रेरणा दि


वस
* म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सभागृहात (मास्क लावून व शारीरिक अंतर ठेवून) आपल्या पसंतीच्या पुस्तकाचे ११:०० ते १२:०० दरम्यान एक तास वाचन केले. व तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी राहून या वेळेत अवांतर वाचन करून ऑनलाइन निबंध स्पर्धेत भाग घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शिक्षकांनी आपल्या मित्र व परिवारातील सदस्यांना एक-एक पुस्तक पीडीएफ  स्वरूपात ऑनलाइन पाठवली.
तद्नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका आयेशा कौसर यांनी  डॉ.कलाम यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. व तसेच प्रोजेक्टर च्या साह्याने डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित विविध व्हिडिओज दाखवण्यात आले. यावेळी सर्वांनी दररोज नियमितपणे निदान एक तास अवांतर वाचन करण्याचा संकल्प केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या