औसा मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाची राज्यमंत्र्यांनी केली पाहाणी.

 औसा मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाची राज्यमंत्र्यांनी केली पाहाणी. 









आ. अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांना उध्दभवलेल्या परिस्थितीची दिली होती माहिती. 





उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून राज्यमंत्र्यांनी केली पाहाणी. 









औसा -   अतिवृष्टीने औसा विधानसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये सोयाबीन बनीम व शेकडो हेक्टरवरील ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत औशाचे आ.अभिमन्यू पवार यांनी या परिस्थितीतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या मतदारसंघातील काही गावांचा दि. १६ आॅक्टोबर रोजी आ. अभिमन्यू पवार व आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. 




                       या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात औसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती औशाचे आ. अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार,राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधून या उध्दभवलेल्या परिस्थितीची माहिती देवून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली होती.एकंदरीत त्यांच्या या मागणीनुसार उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या मतदारसंघाचा दौरा केला यामध्ये कासारसिरसी,शिराढोण, रामलिंग मुदगड व कोकळगाव येथील अतिवृष्टीने उध्दभवलेल्या परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या सोयाबीन बनीम,वाहून गेलेले पुल व ऊसाची पाहाणी केली मातोळा येथील शेतकरी सुभाष भोसले यांच्या शेतातील सोयाबीन व पावसाने वाहून गेलेल्या आशीव - मातोळा रस्त्याची पाहणी त्यांनी केली. यावेळी उपस्थित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची व्यथा यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासमोर मांडून तातडीने मदत देण्याची मागणी केली. 




          यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, संतोषअप्पा मुक्ता,माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे, जि. प. सदस्य सुभाष जाधव,माजी जि. प उपाध्यक्ष रामदास चव्हाण, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय परसणे,ओम बिराजदार, जिलानी बागवान, नितिन पाटील, धनराज होळकुंदे, श्रीराम पाटील, पंडित फुलसुरे, रामलिंग होगाडे, युवराज बिराजदार, परमेश्वर बिराजदार,बालाजी बिराजदार, मातोळा सरपंच बालाजी सूर्यवंशी,मधुकर भोसले, संजय कुलकर्णी,शिवाजी भोसले, दत्ता भोसले, धनंजय भोसले,संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या