उदगीर येथील श्यामार्य कन्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकेचे पोषण आहार चोरी प्रकरणी शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे कार्यवाही करणार का ? का मलिदा गिळून गप्प बसणार !

 उदगीर येथील श्यामार्य कन्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकेचे पोषण आहार चोरी प्रकरणी  शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे कार्यवाही करणार का ?   

का मलिदा गिळून गप्प बसणार ! 


*(व्यंकटराव पनाळे जिल्हा प्रतिनिधी)*

लातुर : दि. २४ - पोलीस गाडी पाठलाग करत आहे असा फोन येताच श्यामार्य कन्या विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका बाईने पोषण आहार घेऊन जात असलेला ऑटो रिक्षा परत फिरवून शाळेत आणून माल उतरवला. 

उदगीर शहरातील नामांकित संस्थेतील पंडित प्रभारी मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांचा असलेला पोषण आहार लंपास करत असताना अधिकाऱ्याचा फोन येताच पोषण आहार परत आणून टाकावा लागल्याने प्रभारी मुख्याध्यापिकेच्या मनाची तृप्ती झाली नाही. विद्यार्थ्यांच्या साठी असलेला पोषण आहार तांदूळ, डाळ, हरभरा हा हडप करण्याची सवय लागल्यामुळेच भर दिवसा दिनांक १९ ऑक्टोंबर २०२० वार सोमवार रोजी दुपारी एक ते दीड च्या दरम्यान ऑटो रिक्षा नंबर एम एच २४, ए टी १३५५ या रिक्षांमधून सदरचा पोषण आहार घेऊन जाण्यात येत होता. मालकाच्या आदेशाचं पालन करणं सेवक हनुमंता वर बंधनकारक होतं. त्यामुळे शाळेचा सेवक हनुमंत याने बाईंच्या आदेशाने एक ते दीड क्विंटल माल ऑटो रिक्षा मध्ये आणून टाकला. सदरचा पोषण आहार ऑटोरिक्षात टाकत असताना अनेकांनी पाहिलेला आहे. अशाच एका प्रत्यक्षदर्शीने सदरची होत असलेली पोषण आहाराची चोरी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्यास फोन करून ऑटोरिक्षा नंबर सह सविस्तर कळवली. गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी बाईने आपली प्रतिभा वापरून चोरीच्या मुळावर घाव घातला. चोरी करणाऱ्या या प्रभारी मुख्याध्यापिका बाईला फोन करून तुमच्या ऑटो रिक्षा च्या मागे पोलीस लागले आहेत. असे सांगताच मुख्याध्यापिका बाईने एस टी कॉलनीतील आपल्या घराकडे जात असलेला ऑटोरिक्षा तात्काळ परत शाळेकडे वळविला. आणि ऑटोरिक्षा मधून घेऊन जात असलेला एक ते दीड क्विंटल पोषण आहार आज्ञाधारक सेवक हनुमंतास परत शाळेत उतरवून ठेवावा लागला. सदरील पोषण आहाराची लंपास होत असलेली बातमी वाऱ्यासारखी उदगीर शहरात पसरली. त्यामुळे अनेक लोक आणि पत्रकार ज्ञात झालेल्या या घटनास्थळाकडे धावले. पत्रकार बांधव आणि जमलेले नागरिक चौकशी करू लागल्यास आमच्या घरी दूध देणाऱ्या दूधवाल्याची मुलगी माझ्या शाळेत असल्यामुळे तो पोषण आहार मी घेऊन जात होते असे मुख्याध्यापिका बाईने सांगितले. सदरील प्रकरणाची दुसऱ्या दिवशी गट शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी शाळेत येऊन चौकशी करून पंचनामा केला आणि मुख्याध्यापिका बाईचा जवाब नोंदवला. त्या जबाबात मुख्याध्यापिका बाईने कहरच केला चक्क सांगून टाकले विद्यार्थ्यांच्या पालकाला कोरोना झाला. त्यामुळे त्यांचा पोषण आहार मी ऑटोरिक्षातून घरी घेऊन जात होते. 

 आता गट शिक्षणाधिकारी भगवान फुलारी कांही कार्यवाही करणार का ? का भगवानही नैवद्य प्राप्तीची वाट पाहणार ! यापूर्वीही उदगीर शहरात असा प्रकार झाला आणि तो दडपला असल्याची लोकांत चर्चा आहे. लातूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री. जी श्रीकांत पोषण आहाराचे चोरी प्रकरणात लक्ष देणार का ? 

या प्रकरणात उदगीरचे गट शिक्षणाधिकारी फुलारी यांनी चौकशी करुण प्रभारी मुख्याध्यापिका बाईवर कार्यवाही करण्याबाबत कळविले असल्याचे समजले आहे. प्रभारी मुख्याध्यापिका बाईवर कार्यवाही करण्याबाबत गटशिक्षणाधिकारी फुलारी यांनी नेमके हा अहवाल कोणाकडे पाठवला आहे ?  कार्यवाही करण्याबाबत संस्थेकडे अहवाल पाठवले असल्यास संस्था काहीही कार्यवाही करणार नाही हे ही तितकेच खरे आहे. आणी कार्यवाही करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अहवाल पाठवला असल्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे हे कार्यवाही करणार का ? का मलिदा गिळून गप्प बसणार !  हा ही एक प्रश्नच आहे. शालेय पोषण आहार  चोरून घरी घेऊन जात असलेल्या कन्या शाळेच्या या प्रभारी मुख्याध्यापिका बाईचे हे प्रकरण आणि या प्रकारणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उदगीर शहरातील एका सामाजिक संघटनेने शालेय पोषण आहार चोरणार्‍या श्यामार्य कन्या विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिकेवर कार्यवाही करून तिला नोकरीतून बडतर्फ करावे या मागणीसाठी उपोषणा चा इशारा दिला असून तशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे आणि  लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत  तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांना पाठवले आहे. 

या प्रकरणाचा जास्त गाजावाजा होऊ नये म्हणून कन्या विद्यालयाच्या या प्रभारी मुख्याध्यापिका बाईने आपले पांडित्य वापरले असुन हे 

प्रकरण वृतपत्रात छापून येऊ नये याकरिता कांही वृत्तपत्राच्या  दिवाळी अंकासाठी प्रभारी मुख्याध्यापिका बाईने जाहिराती पण दिलेल्या आहेत ! गटशिक्षणाधिकारी फुलारी यांच्या  या चौकशी अहवालावर  जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे कांही कार्यवाही करतील अशी अपेक्षा सुद्धा बाळगू नका ! असे खाजगीत जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने व एका जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्यांनी  त्यांच्या पूर्व अनुभवावरून सांगितले.  

मात्र उदगीर शहरातील तमाम जनतेचे तसेच मुख्याध्यापिका बाई शालेय पोषण आहार चोरून घेऊन जात असताना व परत शाळेत आणून ठेवत असताना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे या प्रकरणाकडे विशेष लक्ष आहे.




हाच तो ऑटो रिक्षा एम एच - २४, ए - १३५५  


याच ऑटोरिक्षा मधून श्यामार्य कन्या विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका शालेय पोषण आहार चोरून घराकडे घेऊन जात होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या