शहरातील वारंवार विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठा व इतर असूविधे विरोधात शहरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात.

 शहरातील वारंवार विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठा व इतर असूविधे विरोधात शहरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात... 


नागरिकासह, भाजप पदाधिकारीही सहभागी होणार ... 






एस ए काझी 


औसा प्रतिनिधी /-  शहर पाणीपुरवठा व इतर असूविधेच्या अभावामुळे शहरातील जनता व नागरिकांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने औसा नगर पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात शहरातील नागरिकांसह, भाजपाचे पदाधिकारी प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असा नगर पालिकेचे भाजपचे गटनेते तथा नगरसेवक सुनील उटगे यांनी सज्जड इशारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना दि. 22 आॅक्टोबर 2020 रोजी निवेदनाद्वारे दिला आहे. 

शहरास पाणीपुरवठा होत असणाऱ्या तावरजा मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असताना पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे समस्त जनता व नागरिकांना पाण्यासाठी भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. विस्कळीत असलेली शहरातील पाणी पुरवठा योजना व पाणी पुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्रात तुरटी, ब्लिचिंग पावडर व औषध सामग्रीचा अभावी शहरातील विविध भागा मध्ये पिण्याचे पाणी पुरवठा हे अशुद्ध स्वरूपाचे पुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे, अशुद्ध पाणी पिल्याने आरोग्याची समस्या निर्माण होत आहेत, व समस्त शहरातील नागरिकांच्या आरोग्यांशी, जीवनाशी खेळणे बंद करा, शहरात स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, नाली सफाई, वराह मुक्ती, स्वच्छता अभियान मोहीम, डास उत्तपत्ती निर्मुलन या योजनांचा नुसता दिखावा पालीका सत्ताधारी कडून होत आहे. शहरातील विकास खुंटला आहे, विकास कामे पूर्ण नाहीत, जागोजागी अर्धवट रस्त्याचे व विकास कामे पूर्ण करावेत असे म्हटले आहेत. शहरातील पाणी पुरवठा पुर्वी सारखा सुरळीत नाही झाल्यास आपण तीव्र आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा गटनेते सुनील उटगे यांनी दिला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहराध्यक्ष लहू कांबळे,एकनाथ बनसोडे,मकरंद रामपूरे सचिव, अच्युत पाटील युवा शहराध्यक्ष उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या