लातुरच्या भिम आर्मी चा बरदापुर पोलीस स्टेशला धसका
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विटंबना प्रकरणातील गुन्हेगाराला दोन दिवसात पकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे दिले लेखी आश्वासन
लातुर प्रतिनिधी:-
अंबाजोगाई तालुक्यातील बरदापुर या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे राज्यभरात पडसाद उमटले .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेच पुतळे मनुवाद्यांना का टोचतात .बाबासाहेबांनी संबंध देशातील जनता सुखी समाधानी व एकाच छत्राखाली गुण्यागोविंदाने नांदावी म्हणून देशाला लिखित असे भारतीय संविधान दिले .एवढेच नाहीतर देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अग्रस्थानी नाव आहे. तरी पण आपल्या देशात अनेक महापुरुषांचे अनेक पुळे आहे पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुतळ्याची विटंबना का होते असा सवाल उठवत बरदापुरात पोलीस स्टेशन समोरच ठिय्या मांडला
व तीव्र शब्दात निषेध नोंदवत जो पर्यंत पुतळ्याची विटंबना करणारे आरोपी ला अटक होत नाही व त्यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत उठणार नाही असे ठिय्या आंदोलनाच्या वेळी इशारा व पोलीस निरीक्षक बरदापुर याना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र संघटक अक्षय धावरे मराठवाडा संघटक विनोद कोल्हे लातुर चे जिल्हा प्रमुख विलास चक्रे बाबा ढगे व आंबेजोगाई चे भिम आर्मीचे ही कार्यकर्ते ही हजर होते या निवेदनाची दाखल घेत पोलीस स्टेशन च्या निरीक्षक साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ही देशाला अशोभनीय असून असे कृत्य करणाऱ्यांना दोन दिवसात अटक करू व त्यांचेवर कडक कार्यवाही करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू असें लेखी आश्वासन दिले खालील भिम आर्मी च्या पदाधिकारी ऍड विलास लोखंडे पप्पू हरीभाऊ गोदाम लातुर चे जिल्हा प्रमुख विलास चक्रे व इतर कार्यकर्त्यांना लेखी आश्वासन दिले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.