*भटक्या विमुक्त समाजातील* *स्व.नरेशजी भोरे यांना न्याय्* *मिळावा व नरेशजी भोरे ह्यांच्या* *परावाराला ५० लाख रुपये मदत* *देण्यात यावी*
__________________________
*भटक्या विमुक्त जा.ज. महाराष्ट्र राज्याचे नेते मा संजय मारुती कदम यांची मागणी*
*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सह अनेक *मंत्र्यांना व जिल्हाधिकरी* व *पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा याना* *ईमेलद्वारे निवेदन *पाठवण्यात*आले*.
विशेष प्रतिनिधी :लक्ष्मण कांबळे
"माननिय महोदय,साहेब समाज कार्यात वाहुन घेतलेले सामाजीक कार्यकर्ते स्व.नरेशजी भोरे हे नेहमीच इचलकरंजी कोल्हापुर येथे प्राणीमात्रांसाठी, व भटक्या विमुक्त परीवार आणि गोंधळी जोशी वासुदेव चित्रकथी बागडी समाजात सामाजिक कार्यकर्ते होते ते नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलत होते, पण नगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी यांच्या मानसिक त्रासामुळे नरेशजी भोरे ह्यांनी आत्मदहन केले, पुरोगामी महाराष्ट्रात असे होणे अत्यंत दुर्देवी आहे, ह्या सर्व परीस्थितीला इचलकरंजीचे मुख्य अधिकारी संबंधित अधिकारी घंटा गाडी चालक ठेकेदार, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी नगरपालिका विभाग जबाबदार आहे, त्यामुळे आपणास नम्र निवेदन आहे की नरेशजी भोरे व गोंधळी जोशी वासुदेव चित्रकथा बागडी भटक्या विमुक्त समाजाला त्वरीत न्याय्य मिळावा." अश्या मागणीचे निवेदन मा संजय कदम गोंधळी समाजाचे नेते यांनी ईमेलद्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनावर कांही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे
*आमच्या प्रमुख मागण्या*
१)इचलकरंजी नगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर त्वरी गुन्हे दाखल करण्यात यावे.
२)नगरपालिकेने मानसिक त्रास दिल्यामुळे नरेशजी भोरे असे कृत्य करण्यास भाग पाडले याची जबाबदारी घेऊन नरेशजी भोरे ह्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकिय नौकरीत सामावुन घेऊन नौकरी देण्यात यावे.
३) नरेशजी भोरे ह्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या परीवारावर खुप मोठे संकट आले आहे त्यांच्या परीवाराला जिल्हा प्रशासन व राज्य सरकार मार्फत त्वरीत ५० लाख रुपये देण्यात यावे.
४)पेटा अँनिमल कायद्याअंतर्गत आरोपींवर त्वरीत कारवाइ करण्यात यावे.
५)भटक्या विमुक्त समाजाला शिव्यागाळ करणाऱ्या व गलिच्छ पध्दतीने बोलणाऱ्या अधिकारी व कर्मचारीला त्वरीत निलंबित करण्यात यावे.
६) NT(B) चे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे ते आरक्षण त्वरीत वाढवण्यात यावे.
७)इचलकरंजी येथील गोंधळी जोशी वासुदेव चित्रकथी बागडी बहुरुपी भटक्या विमुक्त समाजाला त्वरीत ५० एकर जमीन देण्यात यावे.
८)भटक्या विमुक्त समाजासाठी त्वरीत संरक्षण कायद्या आनावा वरील सर्व मागण्या त्वरीत पूर्ण नाही झाल्यास संपुर्ण भटक्या विमुक्त जा.ज समाज संविधानिक व लोकशाही मार्गाने रस्त्यावर येईल आणि त्याचा फटका आपल्या सरकारला बसेल त्यामुळे आपणास नम्र निवेदन कि नरेशजी भोरे यांना आणि भटक्या विमुक्त जा.ज. समाजाला त्वरीत न्याय देण्यात असा भटक्या समाजाचे नेते तथा वर्ल्ड नॉमेडिक ट्राइब्स अँड जिप्सी फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय मारूती कदम यांनी दिला आहे आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.