विरशैव कक्कया समाजभूमी विकसित करा
औसा मुख्तार मणियार
श्री विरशैव कक्कया समाज मंडळ औसाच्या वतीने श्री विरशैव कक्कया समाजभुमी विकसित करा या मागणीसाठी आज दिनांक 31 आॅक्टोंबर 2020 शनीवार रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष Dr.अफसर शेख यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात स्मशान भूमीला चारी बाजूने कंपाउंड वॉल, अंत्यविधी करीता शेड, लोकांना बैठक व्यवस्था, हायमस्ट लाईट, बोरवेल व रस्ता या मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्या संदर्भात नगराध्यक्षांनी अनुकूलता दर्शवली व लवकरच काम चालू करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी समाजाचे अध्यक्ष राजाप्पा कटके, उपाध्यक्ष विजय शिंदे, सचिव कृष्णाथ राऊत व समाज बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.