ईद ए मिलादुन्ननबी निमित्ताने राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न....
..
एस ए काझी
लातूर प्रतिनिधी /-
ईद-ए-मिलादुन्नबी च्या सणानिमित्ताने लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष मकरंद भैया सावे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेस पार्टी.व मुन्ना खान मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दि. 31 ऑक्टोबर 2020 रोजी ईद ए मिलादुन्ननबी निमित्ताने भव्य रक्तदान दयानंद गेट समोर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे.उदघाट्क म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंदजी सावे, तर अध्यक्ष म्हणून लातूर महापालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेवक अयुब मणियार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष फिरोज उर्फ टिल्लू शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मुन्ना खान मित्र मंडळातील मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.