नवनियुक्त पोलिस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांची आमदार अभिमन्यु पवार यांनी घेतली भेट.
औसा मुख्तार मणियार
औसा विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार मा श्री अभिमन्यू पवार यांनी लातूरचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांची आज शिष्टमंडळासह भेट घेतली. औसा व निलंगा तालुक्यातील काही गावांमध्ये अवैध दारू विक्री, मटका व जुगार आदी धंदे सुरू असल्याबाबत ग्रामीण भागातील महिलांच्या व नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. स्थानिक पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कठोर कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आणून देत अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी यावेळी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.
यावेळी सोबत भाजप औसा तालुकाध्यक्ष श्री सुभाष जाधव, श्री काकासाहेब मोरे, कासार सिरसी मंडळाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर वाकडे, श्री चंद्रकांत धवन, श्री राजकिरण साठे, श्री दीपक चाबुकस्वार, श्री गोविंद मुडबे, श्री संजय कुलकर्णी, श्री बसवराज पाटील, श्री सुरेश बिराजदार, श्री पंडित फुलसुरे, श्री शिवशरण पाटील, श्री नागेश बोकचडे, ताहेर सयदावले, श्री वामन पाटील, श्री पिंटू बडूरे, श्री मन्सूर रुईकर, श्री सचिन कांबळे, श्री विकास शिंदे, पं.स. सदस्य, सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.