विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासह अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा लातूर येथील पाहणी दौरा संपन्न झाला.*
औसा मुख्तार मणियार/ आफताब शेख
*आशिव टोलनाका येथे शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. शिवली मोड पुलाजवळील श्री.केशवजी सोमवंशी व श्री.गुरुनाथजी काळे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करण्यात आली. तसेच बुधोडा येथे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधांवर भेट देऊन संवाद साधला.*
*अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडून गेलेला आहे, भरून न निघणारे नुकसान झालेले आहे. राज्य सरकारने तात्काळ मदत घ्यावी, पंचनामे करण्यात अडकू नये. केंद्र सरकार मदत देणार आहे. त्यासाठी आमचा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे. मात्र राज्य सरकारने आपले कर्तव्य पार पाडावे. असे मा देवेंद्र .फडणवीस सांगितले आहे.*
*बुधोडा येथील दौऱ्यात, ही वेळ संकटाची आहे. खचून न जाता एकमेकांना धीर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मदत मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करू. मागील वर्षी राज्याचा काळजीवाहू मुख्यमंत्री असताना तात्काळ १०,००० कोटींच्या मदतीची तरतूद केली होती, परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ही मदत तोकडी असल्याचे सांगितले, याची आठवण या निमित्त करून देत त्वरित मदत देण्याची मी मागणी करत आहे. असेही मा.फडणवीस साहेब म्हणाले.*
*अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मा.फडणवीस साहेबांनी आत्मीयतेने दिलासा दिला व त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु असून खचून न जाता धीर धरण्याचे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे सदर परिस्थितीतून लवकरच मार्ग निघेल हा विश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला आहे...*
या प्रसंगी खासदार श्री.सुधाकरजी शृंगारे, जिल्हाध्यक्ष आ.श्री.रमेशजी कराड, आ.श्री.अभिमन्यूजी पवार, आ.श्री.राणाजगजितसिंहजी पाटील, आदि उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.