सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते ओबीसी ब्रिगेडचे नवनियुक्त अध्यक्ष दिलीप पिनाटे यांचा सत्कार संपन्न.
लातुर : दि. १९ - विश्वकर्मा वंशीय समाज संघटना यांच्यातर्फे सामाजिक कार्यकर्ते तथा हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते ओबीसी ब्रिगेडचे नवनियुक्त अध्यक्ष दिलीप पिनाटे यांचा सत्कार संपन्न झाला. लातूर बार्शी रोडवरील विश्वकर्मा गार्डन फंक्शन हॉल येथे दि. १८ ऑक्टोंबर रविवार रोजी दुपारी तिन वाजता हा छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हरंगुळ (बु) चे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे, ओबीसी ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष अजित निंबाळकर व महाराष्ट्र राज्य सुवर्ण शक्ती संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष सुदर्शन बोराडे, लातूर विश्वकर्मा वंशीय समाज संघटन जिल्हाध्यक्ष अनंत पांचाळ उपस्थित होते. सर्वप्रथम संघटनेच्यावतीने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्यंकटराव पनाळे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ओबीसी ब्रिगेडचे नवनियुक्त अध्यक्ष दिलीप पिनाटे यांचा सत्कार शाल पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे आणि ओबीसी ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास वैजनाथ कांबळे, विजय जगदाळे, दिलीप शिंदे, चेवले, पालकर, जाधव, आदी उपस्थित होते. ओबीसी ब्रिगेडचे नवनियुक्त अध्यक्ष दिलीप पिनाटे यांच्या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नागोराव पांचाळ यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.