माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्यासह
ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून उमरगा तालुक्यातील कवठा
व औसा तालुक्यातील उजणी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी
राज्यशासन आपत्तीग्रस्थांच्या पाठीशी, काळजी न करण्याचे आवाहन
औसा प्रतिनिधी : १८ ऑक्टोंबर : लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी रवीवार १८ आँक्टोंबर रोजी पाहणी केली. उमरगा तालुक्यातील कवठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्य शासन आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका... असा धीर दिला.
माजी केंद्रिय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार, राज्याचे वैदयकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी रवीवारी दुपारी उमरगा तालुक्यातील कवठा येथील शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतावर व जाऊन शिवार पाहणी केली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्याशी संवाद सांधला त्यांच्या व्यथा व अडचण समजून घेतली. शेतकऱ्यांनी काळजी करून नये शासन आपल्या सोबत आहे असे सांगून त्यांना धिर दिला.
कवठा येथील भेटीनंतर लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी माजी केंद्रिय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या सोबतच औसा तालुक्यातील उजणी येथे भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पाण्यात सडून नुकसान झालेले सोयाबीन तसेच तुरीचे पिक त्यांच्या निर्दशनास आणून दिले. हे नुकसान पाहिल्या नंतर शासनाने यासर्व नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शेतकऱ्यांनी काळजी करू नये त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन पालकमंत्री ना. देशमुख यांनी दिले. यावेळी शेतकरी शिष्टमंडळाने दिलेले निवेदणे माजी केंद्रिय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार व लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी स्विकारली.
राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री बसवराज पाटील, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार राहुल मोटे, उस्मानाबाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, बसवराज पाटील नागराळकर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, किरण रवींद्र गायकवाड, मकरंद सावे, कृषी, महसूल विभागाचे संबंधित अधिकारी सोबत होते.
---------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.