हाथरस येथे लोकशाही मार्गाने कर्तव्य बजावत असताना केलेल्या दडपशाहीविरोधात देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप

 

हाथरस येथे लोकशाही मार्गाने कर्तव्य बजावत असताना केलेल्या दडपशाहीविरोधात देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप

-   श्रीअमित विलासराव देशमुख

 

 





  राज्यातील ढासळणाऱ्या कायदा सुव्यवस्थेला सुधरवण्याऐवजी कायदेशीर मार्गाची कास धरून जाणाऱ्या माराहुल गांधी  माप्रियांका गांधी यांवर उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असे  वैद्यकीय शिक्षण  सांस्कृतिक कार्यमंत्री श्री अमित देशमुख यांनी म्हंटले आहे.

 

  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेली घटना ही संपूर्ण माणुसकीला लाज आणणारी असून फास्टट्रॅक कोर्टद्वारे या केसाचा निकाल लवकरात लवकर लावून गुन्हेगारांना अत्यंत कडक शिक्षा होणे गरजेचे आहे.

 

  काँग्रेस पक्ष पीडितेच्या कुटुंबासोबत असून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना सांत्वना देण्याकरिता भेट घेण्यासाठी जात असताना काँग्रेस पक्षाचे नेते माराहुलजी गांधी आणि माप्रियंकाजी गांधी यांना धक्काबुक्की करून उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलेलोकशाही मार्गाने शांततेने आपले कर्तव्य बजावत असताना उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या दडपशाहीविरोधात देशभरातील संतप्त काँग्रेस कार्यकर्ते आपला आवाज निश्चित उठवतील असेही ते म्हणाले.

             --------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या