मौजे सास्तूर तालुका लोहारा येथील दहा वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या विरोधात कडक कारवाई करावी
औसा मुख्तार मणियार
मौजे सास्तूर तालुका लोहारा येथील दहा वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या विरोधात कडक कारवाई करून जलद गतीने न्यायालय प्रकरण चालवावे याबाबत आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2020 बुधवार रोजी समस्त औसेकरांच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात तीन ते चार दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील दहा वर्षीय बालिकेवर काही नरधमानी व समाजकंटकांनी बलात्कार केला आहे. सदरील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून अत्यंत निंदनीय आहे. पिडीत बालिका दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. अशा प्रकारच्या घटना ह्या सुसंस्कृत समाजावर मोठा आघात आहे, व काळीमा फासणारा आहे. असे कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात कोणतेही गय न करता अत्यंत कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे ज्यामुळे अशा प्रकारचे कृत्य पुन्हा समाजामध्ये घडू नयेत. वरील घटनेची आम्ही खालील निवेदक निंदा करीत आहोत. प्रशासनाला आमची विनंती आहे की तात्काळ आमची मागणी पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी समस्त औसेकर नागरिक च्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना केली आहे. या निवेदनावर नगरसेवक गोपाळ धानुरे, अडवोकेट शहनवाज पटेल, सामाजिक कार्यकर्ते खुंदमिर मुल्ला, अडवोकेट अशोक रावते, नागेश मुंगळे, संजय जगताप, पवन कांबळे यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.