काटगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

 काटगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी 








उस्मानाबाद / तुळजापूर :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काटगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व 

 अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये धीर धरावा हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशी मदतीबाबत या शासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काटगाव येथील शेतकरी बांधवांना दिली


यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री शंकरराव गडाख खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार ज्ञानराज चौगुले विभागीय सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्यासह शेतकरी व काटगाव ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या