औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत द्यावी; एम आय एम पक्षाची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात असे नमूद केले आहे औसा तालुक्यातील 14 व 15 आॅक्टोंबर 2020 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून यामुळे या खरीप हंगाम शेतकऱ्यांचा हातचा पिक गेला आहे.पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या राशीबरोबरच शेतातील माती सुद्धा वाहून गेल्याने जमीन नापीक होण्याची भीती आहे. त्यात काही कंपन्यांनी सोयाबीन डुप्लीकेट बाजारात विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात शेतकरी आर्थिक संकटात सापडला.मागे दिनांक 13 ते 20 आॅगस्ट पर्यंत सतत रिमझिम पाऊस पडून मूग आणि उडीद पिकांना कोंब फुटल्याने दोन्ही पिके नष्ट झाली. तसेच 19 सप्टेंबर पासून सतत पडलेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबिन पाण्यात गेले.सोयाबिन पिकाला पाणी लागल्यामुळे व सोयाबीन विकास झाडावरच मोड फुटत असल्याने शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून बनीम लावल्या नंतरही मोठ्या पावसामुळे काही बनीमसह सोयाबीन वाहून गेले आहे. तरी पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे न करता सरसगट आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांचे नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावे, तसेच केंद्राचे पथकअद्याप आलेले नाही व आपण चढाओढीने दौरे करीत आहात दौरे थांबवा व शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या.अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर एम आय एम चे सिनियर नेते अॅड गफुरुल्ला हाशमी,औसा तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, शेख पाशा आदिचे सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.