स्ट्रीट लाईटच्या निकृष्ट साहित्या मुळेच आहे हा अंधार !
लाखो रुपयांचा भ्रष्टाचार !!
{ प्रतिनिधी }
लातुर : दि. १७ - लातूर ते बार्शी राज्यमार्गावर छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापासुन हरंगुळ रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकामध्ये स्ट्रीट लाईटचे पोल उभे करून त्यावर बल्प बसवण्यात आलेले आहेत. मात्र शासकीय वसाहती पर्यंतच्या पोल वरीलच बल्प चालू आहेत. महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयापासून हरंगुळ रेल्वे स्थानकापर्यंतचे पोल हे शोभेचे खांब कशासाठी ? असेच म्हणण्याची वेळ जनतेवर आलेली आहे. या स्ट्रीट लाईट च्या कामांमध्ये निकृष्ट साहित्य वापरल्या मुळेच ही लाईट बंद असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे. या कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराला कारणीभूत असणारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी कार्यवाही करून या स्ट्रीटलाइट चे दिवे प्रकाशमान करावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
____________________
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.