अभिमन्यू पवार यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची विविध गावांना भेटी देऊन पाहणी केली

 अभिमन्यू पवार यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची विविध गावांना भेटी देऊन पाहणी केली





औसा मुख्तार मणियार

औसा तालुक्यामध्ये दोन दिवसाच्या अतिवृष्टीने शेतपिकांचे व शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते आज दुपारपर्यंत आमदार अभिमन्यु पवार यांनी मातोळा, उजनी, एकंबी, काजळी चिंचोली, बेलकुंड आदी गावाना प्रत्यक्ष भेटी दिल्या. येथील शेतकरी गावकरी यांच्याशी विचारपूस केली. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली यासाठी आपण पाठपुरावा करू व मदत मिळवून देऊ , तालुक्यातील शेत शिवारातील रस्ते समन्वयातून मोकळे करण्याची मोहीम राबविणार आहोत अशी हमी त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना  दिली. दरम्यान मातोळा गावात अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांची यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, संतोष मुक्ता, संजय कुलकर्णी, आशिवचे सरपंच, उपसरपंच रमेश वळके, मातोळा चे सरपंच, उजनी चे सरपंच, बेलकुंड येथील पदाधिकारी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या