शेलगाव( दि) येथे ए.बा. वि.से. योजनेतर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा
उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) कळंब तालुक्यातील शेलगाव दि: एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रा. प्रकल्प कळंब च्या येरमाळा विभागातील शेलगाव दिवाने येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने
हा बालिका दिन साजरा करण्यात आला. दि. 11 ऑक्टोबर हा जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो, या वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमी असली तरीही हळूहळू जनमानस पूर्वपदावर येण्यासाठी आणि कोरोना विषयीची भीती आणि गैरसमज दूर होण्यासाठी तसेच समाजातील सध्याची समस्या म्हणजे मुलगा मुलगी भेद संपवून स्त्री जन्माचे स्वागत , मुलीं चा योग्य तो सन्मान , मुलींचे शिक्षण, हक्क ,जबाबदारी यासाठी महिलांचे एकत्रीकरण व बालकांच्या किशोरिंच्या पोषणासाठी ,गर्भवती मातांच्या व स्तनदा मातांच्या पोषणासाठी आणि मुलींच्या समानतेसाठी रांगोळी ,नाटिका ,गीतांच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधन व्हावे म्हणून शेलगाव (दि) येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या नियोजनात कोरोना विषयी सर्व दक्षता बाळगून सॅनिटायझेशन करून ,मास्क घालून आणि योग्य ते शारीरिक अंतर ठेवून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती बोरफळ कर
ऐ.बी. यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेच्या पूजनानंतर गावातील सर्व किशोरी आणि बालकांच्या सन्मान करण्यात आला यावेळी गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, याप्रसंगी विविध संदेश देणाऱ्या रांगोळीने सर्वांना आकर्षित केले होते या कार्यक्रमासाठी अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती चंदनशिवे यांच्यासह गावातील सर्व अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.